AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय सांगताय राव ! मुदत ठेवीवर मिळत नाहीत एवढे व्याज RD वर बॅक नव्हे ही वित्तीय संस्था देत आहे 8.5 टक्के व्याज

श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीने आवर्ती ठेव योजनेत परतावा देण्यात इतिहास रचला आहे. ही वित्तीय संस्था 12 महिन्यांच्या जमा रक्कमेवर 7.05 टक्के, 24 महिन्यांच्या आवर्ती ठेव योजनेसाठा 7.12 टक्के तर 36 महिन्यांच्या आरडीवर 8.18 टक्के आणि 48 महिन्यांच्या आरडीवर 8.34 टक्के तर 60 महिन्यांच्या आवर्ती ठेव योजनेत 8.50 टक्क्यांचे व्याज देत आहे.

काय सांगताय राव ! मुदत ठेवीवर मिळत नाहीत एवढे व्याज RD वर बॅक नव्हे ही वित्तीय संस्था देत आहे 8.5 टक्के व्याज
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: May 26, 2022 | 10:26 AM
Share

मुंबई :  जोरदार परतावा देण्यात परंपरागत साधनांमध्ये मुदत ठेव (Fixed Deposit) योजनेनंतर आवर्ती ठेव (Recurring Deposit) योजनेचा अग्रक्रमांक लागतो. गुंतवणुकीचे ही दोन्ही साधने सुरक्षित मानण्यात येतात. एफडी अथवा आरडीतील गुंतवणूक बुडत नाही. हा पैसा सुरक्षित राहतो. परंतू, प्रश्न पडतो तो व्याजाचा. गुंतवणूक करण्यापूर्वी कोणतीही बँक सर्वाधिक व्याज देते, याकडे आपल्याला लक्ष द्यावे लागते. परतावा जिथे जास्त, त्या बँकेकडे आपोआप ग्राहकांची पावले वळतात. महागाईच्या या जमान्यात सहाजिकच अधिक व्याजाची गरज प्रत्येक गुंतवणुकदाराला(Investor) आहे. पैशाला स्वस्थ बसू देऊ नका, त्याला आपल्यासाठी कामाला लावा, असा मंत्र आता सर्वच तज्ज्ञ देतात. त्यामुळे जास्त परतावा जिथे मिळतो. तिथे गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. अशात जर तुम्हाला आवर्ती ठेव योजनेत मुदत ठेवीइतके अथवा जास्त व्याज देत असेल तर ? तर तुमची चांदीच की राव. त्यात ही 8 टक्के व्याज दराने परतावा मिळाला तर सोन्याहून पिवळं. मित्रांनो, ही काही गंमत नाही, खरंच आहे, बँकांपेक्षाही ज्यादा दराने आर्वती ठेव योजनेत 8 टक्के व्याजदराने परतावा देण्यात येत आहे. दोन वित्तीय संस्था (Finance Companies) ग्राहकांना ही सुविधा देत आहे. या दोन्ही वित्तीय संस्था गुंतवणुकीवर 8.5 टक्के व्याज देत आहे.

एमएए असे मानांकन

श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी (STFC) आणि श्रीराम सिटी युनियन फायनान्स कंपनी (STUFC) त्यांच्या आवर्ती ठेव योजनेत तगडे रिटर्नस देतात. आरडीवर या दोन्ही वित्तीय संस्था 8.50 टक्के परतावा देत आहेत. या दोन्ही कंपन्या देशाच्या सर्वात मोठ्या नॉन बँकिग फायनान्शियल कंपन्या (NBFC)आहेत. एसटीएफसी आरडी ला क्रिसिल संस्थेचे FAAA मानांकन प्राप्त आहे. तर इक्रा या मानांकित संस्थेने या कंपनीला एमएए असे मानांकन दिले आहे. ही वित्तीय संस्था 12 महिन्यांपासून ते 60 महिन्यांपर्यंत्चाय आरडीवर 8.50 टक्के व्याज देत आहे. आवर्ती ठेव योजनेत 60 महिन्यांच्या कालावधीसाठी रक्कम ठेवल्यास अशा रक्कमेवर 8.50 टक्के परतावा मिळतो. आरडीवरील हे दर 1 ऑगस्ट 2021 पासून लागू आहेत.

किती मिळत आहे व्याज?

एसटीएफसीच्या आवर्ती ठेव योजनेत 12 महिन्यांसाठी जमा रक्कमेवर 7.05 टक्के, 24 महिन्यांच्या आरडीवर 7.12 टक्के, 36 महिन्यांच्या आरडीवर 8.18 टक्के, 48 महिन्यांच्या आवर्ती ठेव योजनेत 8.34 टक्के आणि 60 महिन्यांच्या आवर्ती ठेव योजनेवर 8.50 टक्के व्याज देण्यात येत आहे. श्रीराम सिटी युनियन फायनान्स कंपनी आवर्ती ठेव योजनेत 12 महिने ते 60 महिन्यांसाठी आवर्ती ठेव योजना चालविते. आरडीत 60 महिन्यांचा कालावधी पूर्ण करणा-या ग्राहकांना कंपनी 8.50 टक्के व्याज दराने परतावा मिळतो. आरडी खाते उघडतानाच ग्राहकाला ऑटो रिफंड अथवा मुदत ठेवीत परवर्तित करण्याची सुविधा मिळते.

Follow Us
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय...
CM Fadnavis On Water Scarcity : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार नाही, कारण त्यामध्ये भाजपचे...
Manoj Jarange : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार नाही, कारण त्यामध्ये भाजपचे लोक... जरांगे पाटील स्पष्टच बोलले
मेट्रो स्थानकांची नावे बदलणार? मुंबई, पुणे, नागपूरसाठी बैठकीत...
मेट्रो स्थानकांची नावे बदलणार? मुंबई, पुणे, नागपूरसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत!
भररस्त्यात दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच... मद्यधुंध तरुणाचा धक्कादायक
भररस्त्यात दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच... मद्यधुंध तरुणाचा धक्कादायक प्रकार
सोलापुरात ऊस दराचा तिढा कायम! जयकुमार गोरेंसोबतची बैठक निष्फळ, आता...
सोलापुरात ऊस दराचा तिढा कायम! जयकुमार गोरेंसोबतची बैठक निष्फळ, कारखानदारांनी मागितली 2 दिवसांची मुदत
दाऊद इब्राहिमच्या जुन्या वास्तव्यावर हातोडा! भेंडी बाजारातील इमारत...
दाऊद इब्राहिमच्या जुन्या वास्तव्यावर हातोडा! भेंडी बाजारातील मुसाफिरखाना इमारतीवर पालिकेची मोठी कारवाई
शायना एनसी यांच्यावर शाईफेक करणाऱ्याला 1 लाखांचे बक्षीस! रूपम घुगे...
शायना एनसी यांच्यावर शाईफेक करणाऱ्याला 1 लाखांचे बक्षीस! रूपम घुगे यांची मोठी घोषणा
शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक..
Shivsena : शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक; पुस्तकात नेमकं काय लिहिलंय?
चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन
Raigad : चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन संपलं, रायगडमधील घटनेने हळहळ
फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला अन्....
Latur : फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला, वसुलीसाठी शेतकऱ्याला शिवीगाळ