सिलेंडरमध्ये किती गॅस उरलाय, हे बघूनच समजणार; जाणून घ्या नव्या स्मार्ट सिलेंडरची वैशिष्ट्ये

सध्याच्या घडीला कंपोझिट सिलेंडर देशातील 28 शहरांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये अहमदाबाद, अजमेर, इलाहाबाद, बेंगलुरू, भुवनेश्वर, चंडीगढ़, चैन्नई, कोईम्बतूर, दार्जिलिंग, दिल्ली, फरीदाबाद, गुरूग्राम, हैदराबाद, जयपुर, जालंधर, जमशेदपुर, लुधियाना, मैसूर, पटना, रायपुर, रांची, संगरूर, सूरत, Tiruchirappalli, Tiruvallur, Tumkur, वाराणसी आणि विशाखापट्टणम या शहरांचा समावेश आहे. |

सिलेंडरमध्ये किती गॅस उरलाय, हे बघूनच समजणार; जाणून घ्या नव्या स्मार्ट सिलेंडरची वैशिष्ट्ये
कंपोझिट गॅस सिलेंडर
Follow us
| Updated on: Oct 02, 2021 | 12:22 PM

नवी दिल्ली: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने अलीकडेच आपल्या ग्राहकांसाठी नवीन स्मार्ट कुकिंग गॅस सिलेंडर लाँच केले आहे. याला कंपोझिट सिलेंडर असे नाव देण्यात आले आहे. या स्मार्ट सिलिंडरची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यात तुम्हाला किती गॅस शिल्लक आहे आणि शिल्लक आहे, हे सहजपणे कळेल.

कंपोझिट सिलेंडरमध्ये तीन थर असतात. हा सिलेंडर उच्च घनतेच्या पॉलिथीनच्या (एचडीपीई) सहाय्याने तयार करण्यात आलेला आहे. ज्यामध्ये पॉलिमर फायबर ग्लासने झाकलेले असेल. पॉलिमर फायबरग्लासने झाकलेले आहे आणि HPDE जॅकेटचा समावेश असेल. हे सिलेंडर वजनाला अत्यंत हलके असतील. सध्याच्या स्टील सिलेंडरच्या तुलनेत या सिलेंडर्सचे वजन जवळपास निम्मे आहे. हा सिलेंडर पारदर्शक असल्याने तुम्हाला सिलेंडरमध्ये नक्की किती गॅस शिल्लक आहे, हे कळू शकेल. त्यामुळे ऐनवेळी गॅस संपल्यावर तुम्हाला धावपळ करावी लागणार नाही.

सिलेंडरला गंज लागत नाही

कंपोझिट सिलेंडरला गंज लागत नाही. त्यामुळे हे सिलेंडर फार खराब होत नाहीत. तसेच या सिलेंडरची बांधणी आकर्षक पद्धतीने करण्यात आली आहे.

कोणत्या शहरांमध्ये कंपोझिट सिलेंडर उपलब्ध?

सध्याच्या घडीला कंपोझिट सिलेंडर देशातील 28 शहरांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये अहमदाबाद, अजमेर, इलाहाबाद, बेंगलुरू, भुवनेश्वर, चंडीगढ़, चैन्नई, कोईम्बतूर, दार्जिलिंग, दिल्ली, फरीदाबाद, गुरूग्राम, हैदराबाद, जयपुर, जालंधर, जमशेदपुर, लुधियाना, मैसूर, पटना, रायपुर, रांची, संगरूर, सूरत, Tiruchirappalli, Tiruvallur, Tumkur, वाराणसी आणि विशाखापट्टणम या शहरांचा समावेश आहे.

कंपोझिट सिलेंडरसाठी सिक्युरिटी डिपॉझिट

10 किलो एलपीजी कंपोझिट सिलेंडरसाठी ग्राहकांना 3,350 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट जमा करावे लागेल. पाच किलोच्या सिलिंडरसाठी 2,150 रुपये मोजावे लागतील.

सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी 1 ऑक्टोबरपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती वाढवल्या आहेत. देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) ने 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत प्रति सिलेंडर 43.5 रुपयांपर्यंत वाढवली आहे. यानंतर, राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये 19 किलो व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1693 रुपयांवरून 1736.5 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे.

पेट्रोल-डिझेलनंतर CNG दरवाढीचा शॉक

केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या किंमतीत 62 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. सन 2012 नंतर सीएनजी आणि पीएनजीच्या दरात झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे. त्यामुळे दिल्लीसह उत्तर भारतात शनिवारपासून सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली. मुंबईत सध्या सीएनजीचा दर प्रतिकिलो 51.98 रुपये इतका आहे. यामध्ये लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. तर पीएनजीचा दर प्रति घनमीटर 49.40 रुपये इतका आहे.

दिल्लीत आजपासून सीएनजीच्या दरात 2.28 रुपये, तर नोएडा, गाझियाबाद आणि ग्रेटर नोएडात सीएनजीचा दर किलोमागे 2.55 रुपयांनी वाढला. तर घरगुती वापरासाठीच्या पीएनजी गॅसच्या दरातही 2.10 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या पुरवठादारांकडून दर किती वाढवले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

संबंधित बातम्या:

पेट्रोल-डिझेलनंतर CNG दरवाढीचा शॉक, नऊ वर्षातील सर्वात उच्चांकी दर

Petrol Diesel Price Today: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ, जाणून घ्या आजचा दर

स्वयंपाकाला कोणते तेल वापरू? लाकडी घाण्याचे की रिफाइंड तेल टाकू? वाचा आहारतज्ज्ञ काय सांगतात

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.