AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेट्रोल-डिझेलनंतर CNG दरवाढीचा शॉक, नऊ वर्षातील सर्वात उच्चांकी दर

CN rates | मुंबईत सर्वाधिक ऑटो रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक CNG इंधनाचा वापर करतात. यासोबतच BEST च्या बस आणि अनेक खासगी गाड्या देखील CNG चा वापर करतात.

पेट्रोल-डिझेलनंतर CNG दरवाढीचा शॉक, नऊ वर्षातील सर्वात उच्चांकी दर
सीएनजी
| Edited By: | Updated on: Oct 02, 2021 | 9:44 AM
Share

नवी दिल्लीः केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या किंमतीत 62 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. सन 2012 नंतर सीएनजी आणि पीएनजीच्या दरात झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे. त्यामुळे दिल्लीसह उत्तर भारतात शनिवारपासून सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली. मुंबईत सध्या सीएनजीचा दर प्रतिकिलो 51.98 रुपये इतका आहे. यामध्ये लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. तर पीएनजीचा दर प्रति घनमीटर 49.40 रुपये इतका आहे.

दिल्लीत आजपासून सीएनजीच्या दरात 2.28 रुपये, तर नोएडा, गाझियाबाद आणि ग्रेटर नोएडात सीएनजीचा दर किलोमागे 2.55 रुपयांनी वाढला. तर घरगुती वापरासाठीच्या पीएनजी गॅसच्या दरातही 2.10 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या पुरवठादारांकडून दर किती वाढवले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

यापूर्वी जुलै महिन्यात मुंबईत महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात किलोमागे 2.58 रुपयांची तर पीएनजीच्या किमतीत 55 पैशांची वाढ केली होती. गॅस पाइपलाइन वाहतुकीच्या खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे परिचालन खर्च आणि अतिरिक्त खर्च देखील वाढला आहे. यामुळेच गॅसच्या दरांमध्ये वाढ केल्याचे महानगर गॅसच्या वतीने सांगण्यात आले होते.

सीएनजी दरात वाढ का?

देशांतर्गत गॅस धोरणानुसार दर सहा महिन्यांनी नैसर्गिक वायूच्या दरांचा फेरआढावा घेतला जातो. त्यानुसार आता 1 ऑक्टोबरला गॅसचे नवे दर निश्चित करण्यात आले. पूर्वीचा अ‍ॅडमिनिस्टर्ड रेट म्हणजे APM चा दर सध्या 1.79 डॉलर्स इतका होता. 1 ऑक्टोबरपासून हे दर वाढवण्यात आले होते. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या केजी-डी6 आणि बीपी पीएलसी (BP Plc) खोल समुद्रातील वायू क्षेत्रातून उत्खनन होणाऱ्या नैसर्गिक वायूची किंमतही ऑक्टोबरपासून वाढली आहे. त्यामुळे आगामी काळात सर्व प्रकारच्या गॅसच्या किंमती 10 ते 11 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

काय परिणाम होणार?

मुंबईत सर्वाधिक ऑटो रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक CNG इंधनाचा वापर करतात. यासोबतच BEST च्या बस आणि अनेक खासगी गाड्या देखील CNG चा वापर करतात. यामुळे सार्वजनिक प्रवास देखील महागणार आहे. सीएनजीच्या वाढलेल्या दरांवरुन नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

संबंधित बातम्या:

महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; कमर्शियल एलपीजीच्या किंमतीत वाढ

Petrol Diesel Price Today: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ, जाणून घ्या आजचा दर

कच्च्या तेलाचे दर तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर, भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ अटळ?

दसरा-दिवाळीपर्यंत ‘ही’ गोष्टही महागण्याची शक्यता; पेट्रोल, डिझेलनंतर ‘कॉमन मॅन’ला आणखी एक झटका

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.