अगदी कमी भांडवलात सुरु करा ‘हा’ व्यवसाय, उत्तम कमाईची संधी

तुम्ही सरकारच्या मदतीने अगदी कमी भांडवलात कटलरी युनिटचा व्यवसाय सुरु करु शकता. कटलरी ही किचनमध्ये हमखास लागणारी गोष्ट आहे. त्यामुळे बाजारपेठेत कटलरी भांड्यांना चांगली मागणीही असते.

अगदी कमी भांडवलात सुरु करा 'हा' व्यवसाय, उत्तम कमाईची संधी

मुंबई: कोरोना संकटाच्या काळात शहरांमधील सर्व व्यवहार ठप्प झाल्याने अनेकांना आपापल्या गावी परतावे लागले होते. कोरोनाच्या लाटा सतत येत असल्याने पुन्हा कधी लॉकडाऊन लागेल, याचा नेम नाही. त्यामुळे अनेकांना नोकरीधंद्याची गरज असूनही शहरांमध्ये परतणे शक्य नाही. यापैकी अनेकजण आता गावातच काहीतरी व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात आहेत. अशा लोकांसाठी एक चांगली संधी चालून आली आहे.

तुम्ही सरकारच्या मदतीने अगदी कमी भांडवलात कटलरी युनिटचा व्यवसाय सुरु करु शकता. कटलरी ही किचनमध्ये हमखास लागणारी गोष्ट आहे. त्यामुळे बाजारपेठेत कटलरी भांड्यांना चांगली मागणीही असते. त्यामुळे हा व्यवसाय तुमच्यासाठी चांगली संधी ठरू शकते.
तुमच्याकडे फारसे भांडवल नसेल तरी हा व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार तुम्हाला आर्थिक मदत करेल. मुद्रा कर्ज योजनेतंर्गत (Mudra Loan Scheme) तुम्ही कर्ज घेऊ शकता.

व्यवसाय फायदेशीर का?

कटलरी भांडी ही घरात दैनंदिन वापरासाठी लागतात. याशिवाय, हॉटेल्स, लग्नसमारंभ, बेकरी आणि आईस्क्रीम पार्लरमध्येही अशा भांड्यांना मागणी असते. त्यामुळे तुम्ही योग्य बाजारपेठ शोधल्यास आणि व्यवस्थित जाहिरात केल्यास तुम्ही या व्यवसायातून चांगले पैसे कमावू शकता.

कटलरी युनिटच्या उभारणीसाठी किती खर्च?

कटलरी युनिटसाठी साधारण साडेतीन लाखांचा खर्च येतो. यापैकी सेटअपसाठी 1.80 लाखांची गरज असते. यामध्ये मशीन, वेल्डिंग सेट, ड्रिलिंग मशीन, बेंच ग्रिडर, पॅनल बोर्ड अशा उपकरणांचा समावेश असतो. याशिवाय, कच्च्या मालासाठी साधारण सव्वा लाख रुपये लागतात. याशिवाय, मजूर, ऑफिसमधील कर्मचारी आणि इतर खर्चासाठी महिन्याला साधारण 30 हजार रुपयांचा खर्च येतो. युनिटसाठी सगळा मिळून साधारण 3.30 लाखांचा खर्च येतो.

यापैकी 1.14 लाखांचे भांडवल तुम्हाला उभारावे लागते. उर्वरित पैशांच्या उभारणीसाठी सरकारकडून मदत केली जाते. त्यासाठी तुम्हाला बँकेत मुद्रा कर्ज योजनेतंर्गत अर्ज करावा लागतो. तुम्ही सर्व निकष पूर्ण केल्यास तुम्हाला आर्थिक मदत मिळते.

व्यवसायातून किती कमाई होते?

सरकारी अहवालातील माहितीनुसार, महिन्याला साधारण 1.10 लाख रुपयांची उलाढाल होते. यापैकी जवळपास 91 हजार रुपये खर्च असतो. त्यामुळे तुम्हाला साधारण 18000 हजार रुपये वरकड रक्कम मिळेल. यामधून कर्जाचा हप्ता आणि इतर खर्च वगळल्यास तुम्हाला महिन्याला किमान 14400 रुपयांचा फायदा होईल.

संबंधित बातम्या:

अगदी कमी भांडवलात सुरु करा व्यवसाय, सरकारकडून अनुदान; महिन्याला पाच लाखांची कमाई

Drumstick Farming: एकदाच 50 हजाराची गुंतवणूक करा आणि दहा वर्षांपर्यंत खोऱ्याने पैसे कमवा

नोकरी शोधण्यापेक्षा 70 हजारात ‘हा’ व्यवसाय सुरु करा आणि कमवा लाखो रुपये

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI