AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारी विद्युत कंपनी एनटीपीसी आणणार आयपीओ; जाणून घ्या काय आहे योजना

ब्लूमबर्ग एनईएफची (बीएनईएफ) नुकतीच व्हर्चुअल शिखर बैठक पार पडली. या बैठकीत एनटीपीसीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक गुरदीप सिंग यांनी कंपनीच्या ऊर्जा क्षमतेसंदर्भातील उद्दीष्टाची माहिती दिली. (State-owned power company NTPC to launch IPO; know what the plan is)

सरकारी विद्युत कंपनी एनटीपीसी आणणार आयपीओ; जाणून घ्या काय आहे योजना
| Updated on: Jun 29, 2021 | 9:47 PM
Share

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील विद्युत कंपनी एनटीपीसीने निधी जमवण्यासाठी एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडचा आयपीओ आणण्याची योजना आणली आहे. या माध्यमातून कंपनीने 2032 पर्यंत 60 गीगावॅटची अक्षय उर्जा क्षमता स्थापित करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. याच माध्यमातून निधी उभा केला जाणार असल्याचे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. (State-owned power company NTPC to launch IPO; know what the plan is)

संयुक्त राष्ट्राच्या ऊर्जा उच्चस्तरीय वार्ताच्या (एचएलडीई) अनुषंगाने आपले ऊर्जा उद्दीष्ट निश्चित करणारी एनटीपीसी ही देशातील पहिली ऊर्जा कंपनी आहे. ब्लूमबर्ग एनईएफची (बीएनईएफ) नुकतीच व्हर्चुअल शिखर बैठक पार पडली. या बैठकीत एनटीपीसीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक गुरदीप सिंग यांनी कंपनीच्या ऊर्जा क्षमतेसंदर्भातील उद्दीष्टाची माहिती दिली. निधी उभारण्यासाठी केवळ एका पर्यायाकडे लक्ष देऊन चालणार नाही. आम्ही लवकरच सार्वजनिक पातळीवर निधी अर्थात पैसे जमवण्याचा विचार करीत आहोत, असे सिंग यांनी शिखर बैठकीत जाहीर केले.

कंपनी प्रत्येक वर्षी 7-8 गीगावाट रिन्यूएबल एनर्जी निर्माण करणार

कंपनी दरवर्षी 7-8 दशलक्ष अक्षय ऊर्जा क्षमतेची भर घालणार आहे. हे उद्दीष्ट फार मुश्किल नाही. याच माध्यमातून एनटीपीसी 2032 पर्यंत 60 गीगावॅटपर्यंतची अक्षय ऊर्जा क्षमता स्थापित करणार आहे. कंपनीने मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये पुनरुत्पादक ऊर्जा व्यवसायासाठी पूर्णपणे स्वतंत्र मालकी असलेल्या एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड या कंपनीची सुरुवात केली आहे, असे गुरदीप सिंग यांनी स्पष्ट केले आहे.

मूळ नफा अडीच पटीने वाढला

एनटीपीसीच्या उत्पन्नाचा आलेख चढता राहिला आहे. कंपनीने कोरोना महामारीतही चांगल्या उत्पन्नाची पातळी कायम राखली आहे. अलिकडेच कंपनीने मार्चच्या तिमाहीतील उत्पन्नाबाबत घोषणा केली आहे. त्यानुसार कंपनीच्या मूळ नफ्यात तब्बल अडीच पटीची वाढ झाली आहे. आकड्यांमध्ये सांगायचे झाल्यास कंपनीला जवळपास 258 टक्क्यांच्या हिशोबाने 4479 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. मार्च 2020 मध्ये कंपनीचा मूळ नफा (स्टँडअ‍ॅलोन) 1252 कोटी रुपये इतका होता. मार्च तिमाहीमध्ये नफ्यामध्ये 2.5 टक्क्यांची घसरण झाली आहे. या तिमाहीत कोरोना महामारीचा काही अंशी परिणाम झाल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गेल्या वर्षीच्या मार्चच्या तिमाहीत कंपनीला एकूण 27247 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. यंदा त्यात घट झाली आणि मार्चच्या तिमाहीत 26567 कोटी रुपयांपर्यंत महसूल घसरला.

गुंतवणूकदारांना लाभांश

कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी लाभांशाची घोषणा केली आहे. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने वित्त वर्ष 2020-21 साठी प्रति शेअर 3.15 रुपयांच्या अंतिम लाभांशाची घोषणा केली आहे. कंपनीने याआधी फेब्रुवारी 2021 मध्ये 3 रुपये प्रति शेअरच्या अंतरिम लाभांशाची घोषणा केली होती. या आठवड्यात कंपनीचा शेअर 117.60 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. 52 आठवड्याची कमाल पातळी 121 रुपये आणि किमान पातळी 78.10 रुपयांची आहे. एका महिन्यात या शेअर्समध्ये 8 टक्क्यांची वाढ झाली आहे. (State-owned power company NTPC to launch IPO; know what the plan is)

इतर बातम्या

पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांनी निवड नाही? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्र्यांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा?

आषाढी वारीवरुन बंडातात्या कराडकरांचा राज्य सरकारला इशारा, समज देण्यासाठी पोलीस थेट कराडकरांच्या आश्रमात!

छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.