AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आषाढी वारीवरुन बंडातात्या कराडकरांचा राज्य सरकारला इशारा, समज देण्यासाठी पोलीस थेट कराडकरांच्या आश्रमात!

सर्व वारकरी संप्रदायाने आळंदी येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांनी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या या आवाहनानंतर फलटण पोलीस पिंप्रदच्या गुरुकुल आश्रमात दाखल झाले आहेत.

आषाढी वारीवरुन बंडातात्या कराडकरांचा राज्य सरकारला इशारा, समज देण्यासाठी पोलीस थेट कराडकरांच्या आश्रमात!
BANDATATYA KARADKAR
| Edited By: | Updated on: Jun 29, 2021 | 9:03 PM
Share

सातारा : सर्व वारकऱ्यांनी आळंदी येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जेष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या या आवाहनानंतर फलटण पोलीस पिंप्रदच्या गुरुकुल आश्रमात दाखल झाले आहेत. मात्र, सध्या कराडकर या आश्रमात उपस्थित नसल्याची माहिती मिळते आहे.(Faltan police reached Pimprad Gurukul Ashram after Bandatatya Karadkar appealed Warkari to gather at Alandi)

फलटण पोलीस पिंप्रदच्या गुरुकुल आश्रमात दाखल

कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच संभाव्य तिसरी कोरोना लाट लक्षात घेता यंदा आषाढी वारीवर अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्य सरकारने तसा निर्णय घेतला आहे. मात्र, बंडातात्या कराडकर यांनी राज्यातील वारकऱ्यांना येत्या 3 जुलै रोजी आळंदी येथे मोठ्या संख्येने अपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच सरकारने कोणतीही कारवाई केली तरी चालेल. पण वारकरी आळंदी ते पंढरपूर असे पायी चालत येणारच असेही कराडकर यांनी ठामपणे सांगितले आहे. त्यांच्या याच आवाहनानंतर आता फलटण पोलीस पिंप्रदच्या गुरुकुल आश्रमात दाखल झाले आहेत.

बंडातात्या कराडकर अनुपस्थित

येत्या 3 जुलैला वारकऱ्यांनी आळंदी येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केल्यानंतर प्रत्यक्ष वारीदरम्यान अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तसेच सध्याच्या कोरोनाकाळात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कराडकर यांना समज देण्यासाठी फलटण पोलीस पिंप्रदच्या गुरुकुल आश्रमात दाखल झाले आहेत. मात्र, कराडकर पिंप्रद येथील आश्रमात उपस्थित ते गायब आहेत.

दरम्यान, पोलिसांना याबाबत विचारले असता वारकरी संप्रदायाला आवाहन केल्याबद्दल कराडकर यांना समज देण्यासाठी पोलीस गेले आहेत, अशी माहिती पोलीस प्रमुख अजय कुमार बंसल यांनी दिली.

वारकरी आळंदी ते पंढरपूर चालत येणारच

वारकरी आळंदी पंढरपूर चालत येणारच, असा एल्गार बंडातात्या कराडकर यांनी केला आहे. याआधी संत तुकाराम महाराज यांच्या बीज सोहळ्यासाठी सर्व वारकऱ्यांना परवानगी द्यावी, या मागणीसाठी जेष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी देहूच्या वेशीवर भजन सत्याग्रह आंदोलनदेखील केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असून मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये वारी सोहळा पार पडणार आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे हा सोहळा पार पडणार आहे. मात्र, आता पुन्हा एकदा बंडातात्या कराडकर यांनी वारकरी आळंदी ते पंढरपूर चालत येणारच, असे म्हटले आहे.

इतर बातम्या :

शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘वर्षा’वर तासभर खलबतं, कोणत्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा?

पुण्यात भाजपची एकहाती सत्ता, पण कारभारी अजित पवार? राजकीय चर्चांना उधाण

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये शुभेच्छा संदेश पाठवणाऱ्या मेंबर्सना अ‍ॅडमिनचा दणका, 10 हजारांचा दंड वसूल!

(Faltan police reached Pimprad Gurukul Ashram after Bandatatya Karadkar appealed Warkari to gather at Alandi)

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.