Gold Silver Price Today News | आज रविवारी सोन्याचे दर स्थिर आहेत. तर चांदीच्या भावात किंचित घट झाली आहे. गेल्या आठवड्यात सराफा बाजारात सोन्याच्या दरात(Gold Rate Today) यापूर्वी 840 रुपयांची वाढ झाली. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँक (American Federal Reserve) व्याजदरात वाढ करण्याची शक्यता लक्षात घेत आणि डॉलर इंडेक्समध्ये घसरण झाल्याने सोन्याच्या किंमतींवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. मंदीच्या आशंकेने ही सोन्याच्या किंमतीत वाढ होत आहे. तसेच गुंतवणूकदारांनीही सोन्यात गुंतवणुकीला सुरुवात केली आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव शुक्रवारी 47,800 रुपये होता, तर 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा शुक्रवारचा भाव हा 52,090 रुपये होता, आज 10 ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना 52,150 रुपये मोजावे लागणार आहे. तर चांदीचा भाव रविवारी 55,600 रुपये किलो होता. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात.