
रिलायन्स जिओ प्रीपेड सिम वापरकर्त्यांना कंपनीच्या सर्व रिचार्ज प्लॅन्सबद्दल अचूक माहिती असायला पाहिजे. जेणेकरून रिचार्ज करताना कोणते फायदे मिळू शकतात याबद्दल समजेल. त्यासाठी आज आपण कंपनीच्या सर्वात स्वस्त प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये असे काही स्वस्त रिचार्ज प्लॅन आहेत 35,100 किमतीचे गूगल जेमिनी प्रोचे फायदे मिळतात. या प्लॅनची किंमत ₹299 आहे. या प्लॅनमध्ये कोणते फायदे मिळतात आणि त्याची वैधता किती दिवसांची आहे? चला हे सविस्तरपणे जाणून घेऊयात.
जिओच्या 299 रूपयांच्या प्लॅनची माहिती
299 रुपयांच्या जिओ प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात.
जिओच्या 299 रूपयांच्या प्लॅनची वैधता
वैधतेच्या बाबतीत बोलायचे झाले तर हा जिओ प्रीपेड प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. 28 दिवसांची वैधता आणि दररोज 1.5 जीबी डेटासह, हा प्लॅन एकूण 42 जीबी हाय-स्पीड डेटा देतो. चला या प्लॅनसोबत मिळणाऱ्या अतिरिक्त फायद्यांबद्दल जाणून घेऊया.
अतिरिक्त फायदे
299 रूपयांच्या प्लॅनसोबत तुम्हाला 35 हजार 100 किमतीचा 18 महिन्यांचा गूगल जेमिनी प्रो प्लॅन, 2000 जीबी क्लाउड स्टोरेज आणि नॅनो बनाना बेनिफिटसुद्धा मिळेल. या प्लॅनमध्ये जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाउड स्टोरेजचा मोफत ॲक्सेससुद्धा समाविष्ट आहे. या तीन अतिरिक्त लाभांसाठी कंपनी तुमच्याकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारत नाही.
एअरटेल 299 रुपयांमध्ये काय ऑफर आहेत?
एअरटेलच्या 299 रूपयांच्या प्लॅनमध्ये कंपनी दररोज 1 जीबी हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देते. 28 दिवसांच्या वैधतेसह, या प्लॅनमध्ये 12 महिन्यांसाठी ॲडोबी एक्सप्रेस प्रीमियम देखील मिळते, ज्याची किंमत अंदाजे 4 हजार रूपयेआहे. याव्यतिरिक्त या प्लॅनमध्ये स्पॅम अलर्ट आणि मोफत हॅलोट्यून्ससारखे अतिरिक्त फायदे देखील मिळतात.