AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

today Gold-silver rate: सोन्याच्या दरात मोठी वाढ; चांदीही वधारली, जाणून घ्या आपल्या शहरातील सोने-चांदीच्या किमती

आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी दिसून येत आहे. चांदीचे दर किलोमागे तब्बल एक हजारांनी वाढले आहेत. जाणून घेऊयात सोने-चांदीच्या किमती

today Gold-silver rate: सोन्याच्या दरात मोठी वाढ; चांदीही वधारली, जाणून घ्या आपल्या शहरातील सोने-चांदीच्या किमती
आजचे सोन्याचे दर Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jun 11, 2022 | 2:55 PM
Share

मुंबई : आज सोन्या, चांदीच्या दरात (Gold-silver prices) मोठी तेजी दिसून येत आहे. गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 52,750 रुपयांवर पोहोचले आहेत. शुक्रवारी 24 कॅरट सोन्याचे दर (Gold prices) प्रति तोळा 52,100 रुपये इतके होते. म्हणजेच आज 24 कॅरट सोन्याच्या दरात तोळ्यामागे 650 रुपयांची वाढ झाली आहे. तर आज 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 48,350 रुपये एवढे असून, शुक्रवारी 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 47,750 रुपये एवढे होते. आज 22 कॅरट सोन्याच्या दरात 600 रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे आज चांदीच्या दरात देखील मोठी वाढ पहायला मिळत आहे. चांदीचा दर प्रति किलोमागे एक हजार रुपयांनी वाढला आहे. शुक्रवारी चांदीचा दर (silver rate) प्रति किलो 61 हजार रुपये एवढा होता. तर आज चांदीचा भाव प्रति किलो 62 हजारांवर पोहोचला आहे. सोन्याचे दर दिवसातून दोनदा जाहीर केले जातात. एकदा सकाळी सराफा मार्केट सुरू होताच. तर दुसऱ्यांदा सायंकाळी त्यामुळे सोन्याच्या दरात काही प्रमाणात तफावत आढळून येते.

राज्याच्या प्रमुख शहरातील भाव

आज सोने-चांदीच्या दरात मोठी तेजी पहायला मिळत आहे. राजधानी मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48,350 रुपये इतका आहे, तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,750 रुपये इतका आहे. उपराजधानी नागपूरमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48,400 रुपये इतका असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,800 रुपये इतका आहे. पुण्यात एक तोळा 22 कॅरट सोन्यासाठी 48,400 रुपये मोजावे लागत आहेत. तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,800 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48,400 रुपये एवढा असून 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,800 रुपये एवढा आहे. औरंगाबादमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48,370 रुपये आहे, तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52770 एवढा आहे.

प्रमुख महानगरातील दर

  1. दिल्लीमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48,350 रुपये एवढा आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,750 रुपये एवढा आहे.
  2. मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा भाव प्रति तोळा 48,350 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा प्रति तोळा दर 52,750 रुपये एवढा आहे.
  3. कोलकातामध्ये 22 कॅरट सोन्याचा रेट प्रति तोळा 48,350 रुपये एवढा आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,750 रुपये एवढा आहे
  4. भारतातील सर्वात महाग सोने चेन्नईमध्ये असून, चेन्नईत एक तोळा 22 कॅरट सोन्यासाठी 48,420 रुपये मोजावे लागत आहेत. तर एक तोळा 24 कॅरट सोन्याचा भाव 52,820 रुपये एवढा आहे.
  5. आज चांदीच्या दरात देखील तेजी असून, चांदीचा दर प्रति किलो 62 हजारांवर पोहोचला आहे.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा