Today Gold-Silver Price : सोन्याच्या घसरणीला ब्रेक, दरात किंचत वाढ; जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे भाव

आज सोन्याच्या घसरणीला ब्रेक लागला असून, सोन्याच्या दरात किंचित वाढ दिसून येत आहे. मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 47 हजार 500 रुपये इतके आहेत.

Today Gold-Silver Price : सोन्याच्या घसरणीला ब्रेक, दरात किंचत वाढ; जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे भाव
सोनं लागलं भाव खायला !Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 2:50 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोन्याच्या दरात (Gold Price) घसरण सुरू आहे. गेल्या काही आठवड्यात सोन्याच्या (Gold) दरात तब्बल तीन ते चार हजारांची घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे, दुसरीकडे सोने स्वस्त होत असल्याने सोन्यामधील गुंतवणूक वाढताना दिसत आहे. आज मात्र सोन्याच्या घसरणीला ब्रेक लागला असून, सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 47 हजार 500 रुपयांवर पोहोचले आहेत. सोमवारी 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 47 हजार 400 इतके होते. त्यामध्ये आज प्रति तोळा 100 रुपयांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे 24 कॅरट सोन्याचे दर हे 51810 रुपयांवर पोहोचले आहेत. चांदीचा दर (Silver Price) प्रति किलो 62500 इतका आहे. सोन्याचे दर हे दिवसातून दोनदा जाहीर होतात. एक सकाळी सराफा मार्केट सुरू होताच तर दुसरे सायंकाळी, त्यामुळे सोन्याच्या दरात शहरनिहाय तफावत आढळून येते.

राज्याच्या प्रमुख शहरातील भाव

गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47 हजार 500 रुपये एवढा आहे, तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51 हजार 810 रुपये प्रति तोळा आहे. पुण्यात 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47 हजार 580 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51 हजार 890 इतका आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47 हजार 580 रुपये आहे, तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51 हजार 890 इतका आहे. नाशिकमध्ये 22 आणि 24 कॅरट सोन्याचा दर अनुक्रमे 47 हजार 540 आणि 51 हजार 860 इतका आहे.

गुंतवणूकदांरामध्ये चिंता

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात घसरण सुरू असल्याने गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे सोन्याचे दर स्वस्त होत असल्याने सोन्याच्या मागणीत देखील वाढ झाली आहे. सध्या भारतात लग्नाचा हंगाम असल्याने सोन्याची मागणी वाढली आहे. गेल्या दीड महिन्यापासून रशिया -युक्रेन युद्ध सुरू आहे, या युद्धाचा परिणाम जसा इतर वस्तूंच्या दरांवर झाला आहे, तसाच परिणाम हा सोन्याच्या दरावर देखील झाला असून, आंतराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या मागणीत घट झाली आहे. मागणी घटल्याने सोने स्वस्त झाल्याचे पहायला मिळत आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.