AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today’s petrol, diesel rates: पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या व्हॅट कपातीनंतर आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर असून, भावात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Today's petrol, diesel rates: पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या व्हॅट कपातीनंतर आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव
पेट्रोल डिझेलचे दर Image Credit source: tv9
| Updated on: May 24, 2022 | 6:48 AM
Share

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज पेट्रोल, डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर आहेत. दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडून महागाईपासून दिलासा देण्यासाठी पेट्रोल, डिझेलच्या अबकारी करात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर पेट्रोल प्रति लिटर 9:30 रुपये तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले. दरम्यान केंद्रापाठोपाठ अनेक राज्यांनी देखील पेट्रोल (Petrol), डिझेलच्या (Diesel) व्हॅटमध्ये कपात केल्याने पेट्रोल, डिझेल आणखी स्वस्त झाल्याचे पहायला मिळाले. सहा एप्रिल ते 22 मार्च या काळात पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल दीड महिना पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर होत्या. मात्र त्यानंतर गेल्या आठवड्यात शनिवारी केंद्राने अबकारी करता कपात करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे पेट्रोल, डिझेल स्वस्त झाले आहे.

प्रमुख महानगरातील आजचे दर

पेट्रोलियम कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये आहे. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर 111.35 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये आहे, तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.24 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 रुपये आहे, तर डिझेलचा दर प्रति लिटर 92.76 रुपये इतका आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील दर

  1. केंद्रानंतर राज्यांनी पेट्रोल, डिझेलच्या व्हॅटमध्ये कपात केल्याने सोमवारी पेट्रोल, डिझेलचे भाव कमी झाले आहेत. मात्र आज पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज इंधनाचे दर स्थिर आहेत. आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये इतका आहे.
  2. पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 108.87 रुपये आहे तर डिझेलचा भाव प्रति लिटर 94 रुपये इतका आहे.
  3. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर 110.95 रुपये आहे, तर डिझेलचा दर प्रति लिटर 97.51 रुपये इतका आहे.
  4. उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 109.35 रुपये असून डिझेलचा दर प्रति लिटर 94.48 रुपये इतका आहे.

Follow Us
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल