AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Loan RBI : कधीच घेऊ नका हे कर्ज, RBI ने काय दिला इशारा

Loan RBI : गरजवंताला अक्कल नसते म्हणतात. त्यामुळे गरजेच्या वेळी आपण मागचा-पुढचा विचार न करता कर्ज घेतो आणि अलगद अडकतो, त्यानंतर जे होते, ते फार मनस्ताप देणारे असते, तेव्हा सावध रहा..

Loan RBI : कधीच घेऊ नका हे कर्ज, RBI ने काय दिला इशारा
रहा सावध
| Updated on: May 19, 2023 | 9:45 AM
Share

नवी दिल्ली : आता पैसा कमावणे आणि कर्ज मिळवणे सर्वात सोपे झाले आहे, असे म्हणतात. आर्थिक चणचण भासली की लागलीच कर्ज (Loan) मिळते. अनेक कंपन्या, वित्तीय संस्था आणि बँकांनी ॲंड्राईड ॲपच्या (Android App) माध्यमातून सुलभ कर्ज पुरवठा करण्यात येतो. ॲपच्या माध्यमातून तुम्ही सहजरित्या कर्ज मिळवू शकता. गरजवंताला अक्कल नसते म्हणतात. त्यामुळे गरजेच्या वेळी आपण मागचा-पुढचा विचार न करता कर्ज घेतो आणि अलगद अडकतो, त्यानंतर जे होते, ते फार मनस्ताप देणारे असते, तेव्हा भारतीय रिझर्व्ह बँकेने सावध रहाण्याचा सल्ला दिला आहे.

मिनिटात मिळवा कर्ज अवघ्या काही मिनिटात कर्ज देणाऱ्या ॲप्सचा सध्या सुळसुळाट आहे. अनेक राज्यात या ॲप्सनी हातपाय पसरले आहे. यातील काहींवर आरबीआयने बंदी आणली आहे. तर काहींनी लागलीच नावात बदल करुन छुप्यारितीने नव्याने कारभार थाटला आहे. या ॲप्समुळे दक्षिणेतील काही राज्यांमध्ये आत्महत्येच्या घटनाही घडल्या आहेत. आरबीआयने अनेकदा त्यांच्यापासून सावध राहण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

कर्ज देण्याचा नाही परवाना यामधील अनेक ॲप्स हे चीन, इंडोनेशियातील आहेत. डिजिटल लोनच्या माध्यमातून हे नागरिकांना अडकवतात. आरबीआयकडून कर्ज देण्याचा परवाना न काढताच यांचा गोरखधंदा सुरु आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत मुंबई, ठाणे, पुण्यासह देशातील अनेक शहरात त्यांचे कारनामे उघड झाले आहेत.

कर्जाचा फास हे इस्टंट लोन अगदी काही मिनिटांतच मिळते. ग्राहकांना तीन महिन्यांचे बँक स्टेटमेंट, आधार कार्ड वा पॅन कार्ड यांची कॉपी या ॲप्सवर अपलोड करावी लागते. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत तुमच्या मोबाईलवर कर्ज मंजूरीचा मॅसेज येतो आणि थोड्याच वेळात तुमच्या खात्यात कर्जाची रक्कम जमा होते. कधी कधी तर केवळ पॅनकार्ड, आधार कार्डवरच कर्ज देण्यात येते. हे ॲप्स चीन, इंडोनेशियातील आहेत, त्यांचा बँक अथवा गैर बँकिंग संस्थांशी (NBFC) काहीच संबंध नाही

असे फसवितात कर्जदार गुगल प्ले स्टोअरवरुन ॲप डाऊनलोड करतात. त्यावेळी त्यांच्याकडून अटी व शर्तींसाठी परवानगी घेण्यात येते. बरेच जण लागलीच कर्ज मिळत असल्याने त्याकडे दुर्लक्ष करतात. हे ॲप तुमचा पर्सनल डाटा, फोटो गॅलरी, जी-मेल, कॉन्टॅक्ट लिस्ट याचा ॲसेस मिळवितात.

असा बसतो फटका ॲपवरुन कर्ज घेतल्यानंतर खरा त्रास सुरु होतो. हे ॲप वार्षिक 30 ते 35 टक्के व्याज घेतात. जर निर्धारीत तारखेला, ड्यू डेटला कर्जाचा हप्ता चुकता केला नाही तर प्रति दिवस 3,000 रुपयांपर्यंत दंड लावतात. एक खड्डा भरण्यासाठी दुसरा खड्डा ग्राहकाला खोदावा लागतो. टोपी फिरवण्याच्या नादात त्याचे नुकसान होते. टेलिकॉलर आणि वसुली एजंट घरात घुसून मारहाण करतात. सामान उचलून घेऊन जातात. सोशल मीडियावर पर्सनल डिटेल शेअर करण्याची धमकी देऊन आव्वाच्या सव्वा रक्कम उकळतात. काही जणांनी या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...