TRAI : प्रीपेड ग्राहकांसाठी 30 दिवसांची व्हॅलिडिटी, दूरसंचार कंपन्यांच्या खेळीला ट्रायचा चाप; ग्राहकांची लूट थांबणार

सध्या दूरसंचार कंपन्यांना प्रीपेड ग्राहकांना 28 दिवसांच्या वैधतेचा रिचार्ज प्लॅन देत आहे. त्यामुळे ग्राहकांना 12 महिन्यांत 13 रिचार्ज करावे लागतात. दूरसंचार कंपन्यांची ही खेळी ओळखून प्रीपेड ग्राहकांसाठी कंपन्यांनी 30 दिवसांचा व्हॅलिडिटी प्लॅन आणावा असे आदेश कंपन्यांना ट्रायने दिलेत.

TRAI : प्रीपेड ग्राहकांसाठी 30 दिवसांची व्हॅलिडिटी, दूरसंचार कंपन्यांच्या खेळीला ट्रायचा चाप; ग्राहकांची लूट थांबणार
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 28, 2022 | 10:58 AM

ग्राहकांची सेवेच्या नावाखाली लूट करणाऱ्या दूरसंचार कंपन्यांना (Telecom Company) भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरणाने (TRAI) चांगलाच दणका दिला. या कंपन्यांच्या मनमानी कारभाराला ट्रायने चाप लावला आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांची लूट थांबविण्यासाठी ट्राय वेळोवेळी निर्णय घेत असते. तसेच दूरसंचार कंपन्यांच्या लूट धोरणापासून ग्राहकांचे हित संरक्षण करते. ग्राहकांच्या अडचणी सोडविण्याचे आणि दूरसंचार कंपन्यांविरोधातील तक्रारीचा निपटारा करण्याचे काम ट्राय करते. टेलिकॉम ऑपरेटर्सना (Telecom Companies) प्रीपेड ग्राहकांसाठी 30 दिवसांची वैधता असलेले रिचार्ज प्लॅन्स द्यावे लागतील, अशी स्पष्ट भूमिका टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI) गुरुवारी घेतली. या निर्णयामुळे ग्राहकाने वर्षभरात केलेल्या रिचार्जची संख्या कमी होईल, अशी अपेक्षा आहे. सध्या टेलिकॉम कंपन्या प्रीपेड सेगमेंटमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह रिचार्ज प्लॅन ऑफर करतात, ज्यामुळे ग्राहकांना एका वर्षात 13 रिचार्ज करण्यास भाग पाडले जाते. म्हणजे वर्षाकाठी एक रिचार्ज शिल्लक करण्यास ग्राहकाला भाग पाडले जाते. ट्रायने एका अधिसूचनेत म्हटले आहे की, “प्रत्येक दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनी किमान एक प्लॅन व्हाउचर, एक विशेष टॅरिफ व्हाउचर आणि 30 दिवसांच्या वैधतेसह कॉम्बो व्हाउचर देईल. दूरसंचार कंपन्यांना अधिसूचनेच्या तारखेपासून 60 दिवसांच्या आत या आदेशाचे पालन करावे लागेल.

प्रत्येक प्लॅनसाठी हा नियम लागू नाही

ट्रायने गुरुवारी याविषयीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, प्रत्येक दूरसंचार कंपनीने, कमीतकमी व्हाऊचर, एक विशेष टेरिफ व्हाऊचर आणि एक कोम्बो व्हाऊचर यांचे मिळून 30 दिवसांची वैधता असेल याकडे लक्ष द्यावे. दूरसंचार कंपन्यांनी या सर्व प्लॅनची एकूण नूतनीकरणाची तारीख पुढील महिन्यात तीच राहिल म्हणजे दिवस कमी न करता पुढील महिन्यात त्याच दिवशी रिचार्जची तारीख येईल. याची खात्री करुन घ्यावी, असे ट्रायने स्पष्ट केले आहे.

मात्र स्वंतत्र प्लॅनसाठी नियम लागू नाही

मात्र हा आदेश सर्वच प्लॅनसाठी लागू नाही. म्हणजे एसएमएस, कॉलिंग, डाटा यांचा एकूण प्लॅन लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र स्वंतत्र प्लॅनसाठी हा नियम लागू करण्यात आला नाही. एक किंवा त्यापेक्षा अधिक ऑफर लागू असेल तर हा नियम लागू असेल. परंतू इतर प्लॅन ग्राहकांना 28 दिवस, 56 दिवस आणि 84 दिवसांचे खरेदी करावे लागतील. नव-नवीन प्लॅन तयार करण्याला आणि त्याच्या वैधतेला ट्रायने परवानगी दिली आहे.

ग्राहकांचे हितसंरक्षण महत्त्वाचे

ग्राहकांच्या आलेल्या प्रतिक्रियेनंतर ट्रायने 28 दिवसांच्या वैधतेऐवजी 30 दिवसांच्या वैधतेचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. दूरसंचार कंपन्यांनी दिवसांची वैधतेबाबत लपवाछपवी न करण्याचे निर्देश ट्रायने दिले आहेत. ग्राहकांचे हितसंरक्षण करणे महत्त्वाचे असल्याचे ट्रायने सांगितले आहे.

सिस्टिम अपडेट करावी लागणार

आता ट्रायच्या निर्देशानंतर टेलिकॉम कंपन्यांना त्यांच्या सिस्टिममध्ये बदल करावे लागतील. प्रत्येक महिन्यांच्या त्याच तारखेला ग्राहकाला रिचार्ज करता यावे अशा पद्धतीने सिस्टिममध्ये बदल करून घ्यावा लागणार आहे. तसेच स्वतंत्र प्लॅन आणि ऑफरसाठी ही सिस्टिममध्ये बदल करावा लागेल. हा बदल करण्यासाठी कंपन्यांना वेळ लागणार आहे. त्यामुळे कंपन्यांना या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी ट्रायने 60 दिवसांचा कालावधी दिला आहे.

तुम्हाला देखील 25 लाखांचा ‘हा’ मेसेज आलाय? नेमकं सत्य काय जाणून घ्या

आता विना इंटरनेटशिवाय आपण करू शकतो पैशांचे व्यवहार, UPI Light नेमके आहे तरी काय?

तुम्ही इनकम टॅक्स जर भरत नसाल तर आताच भरा, आयटीआर फाइल टॅक्स भरण्याचे मिळतात खूप सारे फायदे !!

Non Stop LIVE Update
मोदींमुळे मालवण, तारकर्लीला कुणाला जाता येणार नाही? काय आहे नेमक कारण?
मोदींमुळे मालवण, तारकर्लीला कुणाला जाता येणार नाही? काय आहे नेमक कारण?.
'तो' माणूस नालायक, त्याला सत्तेवर..; ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
'तो' माणूस नालायक, त्याला सत्तेवर..; ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा.
...म्हणून नारायण राणेंचा भाजपमध्ये प्रवेश, ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा
...म्हणून नारायण राणेंचा भाजपमध्ये प्रवेश, ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा.
हीच संस्कृती का? सुप्रिया सुळेंचा शिक्षणमंत्र्यांच्या वर्तवणुकीवर सवाल
हीच संस्कृती का? सुप्रिया सुळेंचा शिक्षणमंत्र्यांच्या वर्तवणुकीवर सवाल.
धाक आहे की नाही? मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे पुन्हा भडकले
धाक आहे की नाही? मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे पुन्हा भडकले.
नाशिक जिल्ह्यात अवकाळीचा हाहाकार; नागली, उडीद, भुईमूग पीकाला फटका
नाशिक जिल्ह्यात अवकाळीचा हाहाकार; नागली, उडीद, भुईमूग पीकाला फटका.
बळीराजा हतबल, केळीबागांसह आठ एकरावरील पीकं उद्धवस्त झाल्यानं हवालदिल
बळीराजा हतबल, केळीबागांसह आठ एकरावरील पीकं उद्धवस्त झाल्यानं हवालदिल.
6 डिसेंबरनंतर देशात काहीही होऊ शकतं, प्रकाश आंबेडकर यांचा दावा काय?
6 डिसेंबरनंतर देशात काहीही होऊ शकतं, प्रकाश आंबेडकर यांचा दावा काय?.
माझ्यामुळे छगन भुजबळ जेल बाहेर पण.., प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा काय?
माझ्यामुळे छगन भुजबळ जेल बाहेर पण.., प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा काय?.
...पर्यंत सरकार कसं पडेल? तुम्ही ताटाखालचं मांजर, राऊतांचा रोख कुणावर?
...पर्यंत सरकार कसं पडेल? तुम्ही ताटाखालचं मांजर, राऊतांचा रोख कुणावर?.