BoB Positive Pay System | आजपासून बदलणार या सरकारी बँकेतील व्यवहार, 2 कोटी ग्राहकांचे व्यवहार होणार एकदम सुरक्षित

BoB Positive Pay System | देशातील आघाडीची सरकारी बँक 'बँक ऑफ बडोदा'मध्ये 1 ऑगस्टपासून सकारात्मक वेतन प्रणाली उपलब्ध होत आहे. ग्राहकांना धनादेश फसवणुकीपासून वाचवण्यासाठी ही सेवा देण्यात येत आहे.

BoB Positive Pay System | आजपासून बदलणार या सरकारी बँकेतील व्यवहार, 2 कोटी ग्राहकांचे व्यवहार होणार एकदम सुरक्षित
आता गैरप्रकारांना बसेल आळाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 10:03 AM

BoB Positive Pay System | जर तुमचं बँक खातं बँक ऑफ बडोदामध्ये (BoB) असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आजपासून   1 ऑगस्टपासून बँक ऑफ बडोद्यामध्ये धनादेश तपासणीबाबतच्या नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहे. ही सरकारी बँक ग्राहकांना धनादेश वटल्यावर 1 ऑगस्टपासून सकारात्मक वेतन प्रणाली (BoB Positive Pay System ) लागू करणार आहे. पाच लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या धनादेशातील महत्त्वाच्या माहितीचा बँक धनादेश (Cheque Transaction) वटण्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पडताळा घेणार आहे. ही सुविधा ग्राहकांच्या हितासाठी असून यामुळे धनादेश फसवणुकीच्या अनेक प्रकारांना आता आळा घालता येणार असून ग्राहकांची फसवणूक टळणार आहे. विशेष म्हणजे ग्राहक फसवणुकीपूर्वीच या पद्धतीचा वापर करुन बँकेला धनादेशातील रक्कम न देण्याचे कळवू शकतो. त्यामुळे वेळेवर होणारी धांदल उडणार नाही आणि सुरक्षित व्यवहार होईल.

करणार डिजिटल खात्री

पॉझिटिव्ह पे सिस्टीमच्या(BOB Positive Pay System) माध्यमातून बँक ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या धनादेश फसवणुकीपासून वाचवणार आहे. 1 ऑगस्टपासून बँकेच्या ग्राहकांना 5 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या धनादेश वटण्याअगोदर डिजिटली कन्फर्म करावं लागणार आहे. यापुढे कोणालाही चेक देण्यापूर्वी बँकेला ग्राहकाचे पत्र द्यावे लागणार आहे, जेणेकरून बँकेला कोणत्याही कन्फर्मेशन कॉलशिवाय पेमेंटसाठी पाच लाख रुपयांचा धनादेशाची प्रक्रिया पार पाडता येईल.पण ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास धनादेश वटणार नाही.

हे सुद्धा वाचा

पॉझिटिव्ह पे सिस्टम म्हणजे काय?

ही पॉझिटिव्ह पे सिस्टम म्हणजे काय (What is Positive Pay System)आणि त्याचा वापर कसा करण्यात येतो, असा प्रश्न ग्राहकांच्या मनात येतो. सकारात्मक वेतन प्रणालीअंतर्गत बँकेला धनादेश रक्कमेविषयी आगाऊ माहिती द्यावी लागेल. चेक वटविण्यापूर्वी चेकच्या तारखेबाबत दिलेल्या डेटाबाबत दिलेली माहिती बँक क्रॉस चेक करेल. आरबीआयने हा नियम लागू केला आहे. चेकचा गैरवापर रोखण्यासाठी हा नियम तयार करण्यात आलेला आहे. पॉझिटिव्ह पे सिस्टीम सुरू झाल्यानंतर धनादेश देणाऱ्याला धनादेशाची तारीख, लाभार्थ्याचे नाव, खाते क्रमांक, एकूण रक्कम, ट्रान्झॅक्शन कोड आणि चेक नंबर याची माहिती एसएमएस, इंटरनेट बँकिंग, एटीएम किंवा मोबाइल बँकिंगद्वारे बँकेला द्यावी लागणार आहे. चेक वटविण्यापूर्वी बँक या माहितीची उलटतपासणी करेल. सगळं व्यवस्थित आढळल्यास बँक चेक क्लिअर करेल.

या बँकांमध्ये आधीपासूनच सुविधा

बँक ऑफ बडोदा पूर्वी देशातील अनेक बँकांनी सकारात्मक वेतन प्रणाली लागू केली आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), आयसीआयसीआय बँक (ICICI), पंजाब नॅशनल बँक, अॅक्सिस बँक आणि एचडीएफसी (HDFC)बँक यांचा समावेश आहे.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.