AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘स्मार्ट कार्ड’ नको रे बाबा; आधारबाबत महत्वपूर्ण अपडेट, ‘हे’ कार्ड आता कचऱ्यात!

एम-आधार प्रोफाईल किंवा यूआयडीएआयद्वारे जारी करण्यात आलेले आधार प्रमाणित मानले जाईल आणि आधारची आवश्यकता असलेल्या सर्व कामांच्या ठिकाणी उपयोगात आणण्यास मान्यता राहील.

‘स्मार्ट कार्ड’ नको रे बाबा; आधारबाबत महत्वपूर्ण अपडेट, ‘हे’ कार्ड आता कचऱ्यात!
आधार कार्ड Image Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Jan 18, 2022 | 6:55 PM
Share

नवी दिल्ली- देशभरातील आधारकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतात आधार कार्डचे नियमन करणाऱ्या ‘यूआयडीएआय’ने (UIDAI) आधारधारकांसाठी अपडेट जारी केले आहे. आधारकार्ड प्रिंट करुन प्लास्टिक कार्डच्या (पीव्हीसी कार्ड) रुपात बनविण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र, सुरक्षिततेच्या कारणामुळे अशा प्रकारचे कार्ड बनविण्याऱ्यांना ‘यूआयडीएआय’ने सतर्कतेचा इशारा दिला आहे. आधार धारकांच्या गोपनीय माहितीचे उल्लंघन होण्याचा यामुळे धोका असल्याचे ‘यूआयडीएआय’ने म्हटले आहे. पीव्हीसी आधार कार्ड (Aadhhar card) प्रमाणित सरकारी एजन्सीकडून प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे केवळ 50 रुपयांचे शुल्क भरुन ग्राहक आधार कार्ड ऑर्डर करू शकतात. ‘यूआयडीएआय’ने ट्विटरद्वारे लिंकही जारी केली आहे. UIDAI ने ट्विटद्वारे महत्वाचा खुलासा केला आहे. पीव्हीसी कार्ड किंवा प्लास्टिक कार्ड तसेच आधार स्मार्ट कार्ड सार्वजनिक खासगी ठिकाणी बनविल्यास वैध कागदपत्रे (VALID DOCUMENT) ठरणार नाही.

कोणते आधार वैध?

ट्वीटमध्ये नेमके कोणत्या प्रकारचे आधार वैध असतील याविषयी देखील यूआयडीएआयने माहिती दिली आहे. uidai.gov.in वरुन डाउनलोड केलेले आधार, एम-आधार प्रोफाईल किंवा यूआयडीएआयद्वारे जारी करण्यात आलेले आधार प्रमाणित मानले जाईल आणि आधारची आवश्यकता असलेल्या सर्व कामांच्या ठिकाणी उपयोगात आणण्यास मान्यता राहील.

‘ते’ स्मार्टकार्ड टाळा:

आधारकार्ड बनविण्यासाठी अर्ज केला जातो. योग्य अर्ज आणि विहित प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आधारच्या वेबसाईटवर कार्ड उपलब्ध होते. वस्तुत: आधारची पीडीएफ उपलब्ध केली जाते. अधिकांश लोक ह्याच पीडीएफचे खासगी झेरॉक्स किंवा लॅमिनेशन सेंटर येथे स्मार्टकार्ड किंवा लॅमिनेशन कार्डमध्ये रुपांतरित करतात. मात्र, दुकानदारांनी बनविलेल्या अशाप्रकारच्या प्लास्टिक कार्डमध्ये कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसते. त्यामुळे आधार नंबरसह महत्वाची गोपनीय माहिती लीक होण्याचा सर्वात मोठा धोका असतो. देशभरातून यूएडीएआयकडे याप्रकारच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत.

सुरक्षा धोक्यात, माहितीचा गैरवापर

खासगी झेरॉक्स सेंटर किंवा लॅमिनेशन सेंटरवर स्मार्ट कार्ड बनविल्यामुळे महत्वाची माहिती लीक होऊ शकते. प्लास्टिक कार्ड बनविण्यासाठी दुकानदार कंम्पुटरचा वापर करतात. त्यामुळे ग्राहकाची आधार पीडीएफ ऑपरेटरच्या संगणकावर सेव्ह होते. अनोळखी सिस्टीमवर आधार पीडीएफ सेव्ह होणे धोक्याचे ठरते. त्यामुळे यूआयडीएआय द्वारे मागवून त्यानंतरच कार्ड बनविण्याचा सल्ला दिला जात आहे.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.