उतारवयात पेन्शनची हमी, केंद्र सरकारची खास योजना; म्हातारपणी मिळणार 60 हजारांची पेन्शन

| Updated on: Oct 15, 2021 | 7:20 AM

Pension Scheme | तुम्ही वयाची साठी ओलांडल्यानंतर तुम्हाला महिन्याला पेन्शन सुरु होईल. यामध्ये तुमच्या गुंतवणुकीप्रमाणे 1000 ते 5000 रुपयांची पेन्शन दिली जाईल. 18 ते 40 वयोगटाच्या व्यक्ती या योजनेत पैसे गुंतवू शकतात.

उतारवयात पेन्शनची हमी, केंद्र सरकारची खास योजना; म्हातारपणी मिळणार 60 हजारांची पेन्शन
अटल पेन्शन योजना
Follow us on

नवी दिल्ली: आयुष्यातील उतारवयात निवृत्ती वेतन हा ज्येष्ठांसाठी प्रमुख आर्थिक आधार मानला जातो. मात्र, खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शनची (Pension) सुविधा उपलब्ध नसते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून अनेक निवृत्तीवेतन योजना (Pension Scheme) चालवल्या जातात. यापैकीच एक म्हणजे अटल पेन्शन योजना. या योजनेत तुम्ही महिन्याला 210 रुपये गुंतवून म्हातारपणी दर महिन्याला पाच हजारांची पेन्शन मिळवू शकता. याचा अर्थ तुम्हाला दरवर्षी 60 हजारांची पेन्शन मिळेल.

तुम्ही वयाची साठी ओलांडल्यानंतर तुम्हाला महिन्याला पेन्शन सुरु होईल. यामध्ये तुमच्या गुंतवणुकीप्रमाणे 1000 ते 5000 रुपयांची पेन्शन दिली जाईल. 18 ते 40 वयोगटाच्या व्यक्ती या योजनेत पैसे गुंतवू शकतात.

योजनेत गुंतवणूक करण्यासाठी बँकेत बचत खाते, आधार कार्ड आणि चालू मोबाईल नंबर या गोष्टी गरजेच्या आहेत. या योजनेत तुम्ही किमान 20 वर्षे गुंतवणूक करणे गरजेचे आहे. तुम्ही मासिक, त्रैमासिक किंवा सहामाही पद्धतीने प्रीमिअम जमा करु शकता. तुमच्या खात्यातून नियोजित तारखेला पैसे कापले जातील. म्हातारपणी तुम्हाला किती पेन्शन हवी यावर प्रीमियमचा हप्ता ठरेल. तसेच यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना दीड लाख रुपयापर्यंतची करमाफी मिळेल.

अटल पेन्शन खाते कसे सुरु कराल?

* कोणत्याही बँकेत जाऊन तुम्ही अटल पेन्शन स्कीमचे खाते सुरु करु शकता.
* अटल पेन्शन योजनेचा फॉर्म ऑनलाईन डाऊनलोडही करता येईल.
* हा फॉर्म तुमच्या नजीकच्या बँक शाखेत द्यावा लागेल.
* या फॉर्मसोबत तुम्ही मोबाईल नंबर आणि आधार कार्डाची छायांकित प्रत देणे गरजेचे आहे.
* तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला मोबाईलवर मेसेज येईल.

अटल पेन्शन योजना लोकप्रिय

कोव्हिड 19 महामारीच्या संकटाच्या (COVID-19 Pandemic) काळात अटल पेन्शन योजना (AYP) आणि नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) अंतर्गत खातेधारकांची संख्या 22 टक्क्यांनी वाढून 4.15 कोटी झाली आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) च्या मते, फेब्रुवारी 2021 पर्यंत विविध योजनांमधील खातेदारांची संख्या फेब्रुवारी 2020 मध्ये 3.43 कोटींवरून वाढून 4.14 कोटी झाली आहे, वार्षिक आधारावर 21.85 टक्क्यांनी वाढ दिसून आली होती.

बचत खात्याशिवाय नावनोंदणी नाही

APY योजनेत सामील होण्यासाठी बचत खाते किंवा पोस्ट ऑफिस बचत खाते असणे आवश्यक आहे. एक व्यक्ती फक्त एकच API खाते उघडू शकते. कोणत्याही ग्राहकाला या योजनेत दरमहा किती रक्कम जमा करावी लागेल हे त्याच्या वयावर आणि त्याला किती पेन्शन मिळवायचे आहे यावर अवलंबून आहे. जर दरमहा जमा केलेली रक्कम वेळेवर भरली नाही तर त्यासाठी दंड वसूल केला जाईल.

साथीदाराच्या मृत्यूनंतर जोडीदार खाते चालू ठेवू शकतो

जर APY सदस्य वयाच्या 60 वर्षांपूर्वी मरण पावला, तर हे खाते सुरू ठेवण्याचा अधिकार जोडीदाराला आहे. जर तुम्हाला या योजनेसंदर्भात अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही 1800-110-069 या क्रमांकावर कॉल करू शकता. जर एखाद्या ग्राहकाला 60 वर्षांपूर्वी या योजनेतून बाहेर पडायचे असेल तर तो स्वेच्छेने या योजनेतून बाहेर पडू शकतो. या प्रकरणात, त्याला व्याजासह एकूण योगदान मिळेल.

इतर बातम्या:

महागडा मोबाईल, त्याचा विमा, नंतर क्लेम, पोलिसात तक्रारीचा कट आणि महिला अडचणीत

भारतात कोणती कंपनी मोबाईल इंटरनेटमध्ये अव्वल? ट्रायची नवी आकडेवारी जाहीर

वोडाफोन-आयडियाचा नवा प्लान लाँच, 100 जीबीचा हायस्पीड डेटा मिळणार