व्यवसाय सुरु करायचा विचार करताय, मोदी सरकारकडून मिळू शकते 10 लाखांची मदत

Business loan | केंद्र सरकारच्या या योजनेतंर्गत तुम्हाला व्यवसाय सुरु करण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य मिळू शकते. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी किंवा सध्याच्या व्यवसाय वाढवण्यासाठी अशा दोन्ही गोष्टींसाठी पंतप्रधान मुद्रा योजनेतंर्गत (PMMY) कर्ज मिळते.

व्यवसाय सुरु करायचा विचार करताय, मोदी सरकारकडून मिळू शकते 10 लाखांची मदत
money market fund
Follow us
| Updated on: Aug 03, 2021 | 11:38 AM

मुंबई: कोरोना संकटामुळे अनेकजण बेरोजगार झाले आहेत. लॉकडाऊनमुळे उद्योगधंद्याचेही तीनतेरा वाजले आहेत. अशा परिस्थितीत तुम्हाला पुन्हा नव्या जोमाने व्यवसायात उतरायचे असेल तर केंद्र सरकारची एक योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते. देशातील नागरिकांना आत्मनिर्भर करण्याच्यादृष्टीने मोदी सरकारने ही योजना सुरु केली होती.

केंद्र सरकारच्या या योजनेतंर्गत तुम्हाला व्यवसाय सुरु करण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य मिळू शकते. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी किंवा सध्याच्या व्यवसाय वाढवण्यासाठी अशा दोन्ही गोष्टींसाठी पंतप्रधान मुद्रा योजनेतंर्गत (PMMY) कर्ज मिळते. ज्या लोकांना बँकेतील जाचक अटींमुळे कर्ज मिळू शकत नाही, अशांसाठी ही योजना वरदान ठरणारी आहे. तुमचा एखादा लघुद्योग असेल आणि तुमच्याकडे फक्त पार्टनरशिप डिड असेल तरीही पंतप्रधान मुद्रा योजनेतंर्गत तुम्हाला कर्ज दिले जाते.

तीन प्रकारचे कर्ज

पंतप्रधान मुद्रा योजनेतंर्गत तीन प्रकारेच कर्ज दिले जाते. यामध्ये शिशु लोन, किशोर लोन और तरुण लोन अशा प्रकारांचा समावेश आहे. शिशु योजनेतंर्गत दुकान उघडण्यासाठी 50 हजारांचे कर्ज दिले जाते. तर किशोर लोन योजनेत 50 हजारापासून पाच लाखांपर्यंत कर्ज मिळते. तरुण लोन योजनेत 5 ते 10 लाखांपर्यंतचे कर्ज मिळते.

कोणाला मिळते कर्ज?

PMMY योजनेतंर्गत लहान व्यापारी आणि उद्योजकांना कर्ज मिळते. यामध्ये लहान कारखाने, दुकानदार, फळ किंवा भाजी विक्रेत, ट्रकचालक, रिपेअरिंगची दुकाने, लघुद्योग आणि फूड प्रोसेसिंग युनिट सुरु करण्यासाठी कर्ज मिळू शकते. प्रधानमंत्री मुद्रा योजनेतील (PMMY) कर्जासाठी सरकारी बँका, ग्रामीण बँका, खासगी बँकांमध्ये अर्ज केला जाऊ शकतो. रिझर्व्ह बँकेने 27 सरकारी बँका, 17 खासगी बँका, 31 ग्रामीण बँका, 36 मायक्रोफायनान्स संस्था आणि 25 बिगरबँकिंग संस्थांना मुद्रा लोन वितरीत करण्याचा अधिकृत हक्क दिला आहे. mudra.org.in या संकेतस्थळावर तुम्हाला योजनेविषयी अधिक माहिती मिळू शकेल.

संबंधित बातम्या

‘वर्क फ्रॉम होम’ संस्कृतीत कंपन्या स्त्रियांना देतायत जास्त पगार, पॅकेजमध्ये 70 टक्क्यांपर्यंत वाढ

स्मार्ट सेव्हिंग: अशा प्रकारे वैयक्तिक कर्जावरील व्याज करा कमी, कर्ज घेण्यापूर्वी 4 टिप्स जाणून घ्या

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.