UIDAI : आधार कार्डमध्ये असे अपडेट करा डिटेल्स, जाणून घ्या अंतिम तारीख

UIDAI : आधार कार्डमध्ये बदल करायचा असेल, नव्याने माहिती अद्ययावत करायची असेल तर आता तुम्हाला ही संधी उपलब्ध झाली आहे. काही अपडेट पूर्णपणे निःशुल्क आहे.

UIDAI : आधार कार्डमध्ये असे अपडेट करा डिटेल्स, जाणून घ्या अंतिम तारीख
Follow us
| Updated on: Apr 29, 2023 | 12:17 PM

नवी दिल्ली : आधार कार्डमध्ये चुकीची माहिती असेल, नावात, पत्त्यात, लिंगात चूक झाली असेल तर ती आता तुम्हाला सहज दुरुस्त करता येईल. तसा तर ही माहिती अद्ययावत करण्यासाठी शुल्क आकारण्यात येते. पण केंद्र सरकारने आधार कार्ड अपडेट (Aadhaar Card Update) करण्याची मोफत संधी दिली आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) नागरिकांकडून ही माहिती अद्ययावत करण्यासाठी कोणतेच शुल्क आकारणार नाही. आता ऑनलाईन आधार कार्ड अपडेटसाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही. तर आधार केंद्रावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण केल्यास तुम्हाला कमीत कमी 50 रुपये शुल्क द्यावे लागेल.

घरबसल्या करा बदल UIDAI ने नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन आधार कार्ड अपडेटची सुविधा दिली आहे. ही माहिती अद्ययावत करण्यासाठी नागरिकांकडून कुठलेही शुल्क वसूल करण्यात येणार नाही. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला आधार कार्डमध्ये मोफत बदल करता येणार आहे. 15 मार्च ते 14 जून, 2023 या दरम्यान ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. UIDAI ने 10 वर्षांपेक्षा अधिक जुन्या आधार कार्ड धारकांना त्यांची माहिती अपडेट करण्याचे आवाहन केले आहे. तसेच 5 आणि 15 वर्षी सुद्धा आधार कार्डमध्ये बदल करणे गरजेचे आहे.

UIDAI च्या डिजिटल इंडिया इनिशिएटिव्ह अंतर्गत myAadhaar पोर्टलवर https://myaadhaar.uidai.gov.in तुम्हाला मोफत आधारकार्ड अपडेट करता येईल. कागदपत्रे अपलोड करता येईल. पोर्टलवर आईडी प्रूफ आणि प्रूफ ऑफ एड्रेस (PoI/PoA) टाकून आधार कार्ड दुरुस्त करता येईल.

हे सुद्धा वाचा

या गोष्टी आवश्यक आधार कार्डमध्ये ऑनलाईन पद्धतीने काही माहिती अपडेट (Aadhaar Online Update) करु शकता. तर काही माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन कागदपत्रे जमा करावी लागतात. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नाव, लिंग, जन्मतारीख, पत्ता आणि भाषा बदलवू शकता, त्यात बदल करु शकता. ऑनलाईन दुरुस्तीसाठी, सुधारणेसाठी तुमचा दहा अंकी मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.

असे करा आधार कार्ड अपडेट

  1. UIDAI च्या सेल्फ सर्विस अपडेट पोर्टलवर जा
  2. https://ssup.uidai.gov.in/ssup/ यावर लॉगिन करा
  3. तुमचा 12 अंकांचा आधारा कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका
  4. ओटीपी पाठविण्याचा पर्याय निवडा, त्यानंतर पुढील प्रक्रिया करा
  5. आधार संबंधीत मोबाईल क्रमांकावर हा ओटीपी येईल
  6. ओटीपी टाकून ‘अपडेट आधार ऑनलाइन’ हा पर्याय निवडा
  7. ‘प्रोसीड टू अपडेट आधार’ हा पर्याय निवडा, माहिती भरा

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....