
आपल्याकडे कोणतेही सरकारी काम असो त्यासाठी सरकारी कार्यालयात जाऊन तुम्हाला लांबच्या लांब रांगेत किंवा तासंतास अधिकाऱ्यांची वाट बघत बसल्याशिवाय काम पूर्ण होत नाही. मात्र आता डिजिटल इंडियानंतर संपूर्ण समीकरण बदलले आहे. आता तासनतास रांगेत उभे राहण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त तुमचा स्मार्टफोन घेऊन तुम्हाला हवं असलेल्या सरकारी कामाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
अशातच आता तुम्हाला जर मतदानाचे ओळखपत्र काढायचे असल्यास कोणत्याही सरकारी कार्यालयाबाहेर उभं न राहता फक्त या सोप्या पद्धतीने तुमच्या फोनमधून प्रक्रिया पूर्ण करून तुमचं ऑनलाईन मतदान ओळखपत्र काढता येणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात संपूर्ण प्रोसेस…
समोर स्किनवर तुमचे तपशील भरावे लागणार आहे. यात दिलेल्या पर्यायात तुमचे राज्य निवडा, तुमचा जिल्हा व तुमचा विधानसभा मतदारसंघ निवडा. त्यानंतर पर्यायमध्ये आता तुमची जन्मतारीख प्रविष्ट करा. जन्मतारखेच्या नोंदणीसाठी डॉक्यूमेंट पर्यायावर क्लिक करा आणि त्यात आधार कार्डचा फोटो अपलोड करा. फोटोचा आकार २०० केबीपेक्षा मोठा नसावा. त्यानंतर नेक्स्ट वर टॅप करा. आता तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करण्याचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून फोटो अपलोड करा. यानंतर तुम्हाला तुमचे जेंडर निवडावे लागेल. व पुढे तुमचे नाव प्रविष्ट करा. तसेच मोबाईल नंबर आणि नंतर तुमचा ईमेल आयडी प्रविष्ट करा.
यानंतर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर नवीन पर्याय दिसतील.यावर तुम्हाला तुमचे नाते या ऑप्शनवर क्लिक करा. उदाहरणार्थ तुम्ही तुमचे वडील हा पर्याय निवडू शकता. त्यानंतर त्याखाली वडिलांचे नाव लिहा. आता पुढे तुमचा संपूर्ण पत्ता दिलेल्या पर्यायाप्रमाणे भरून घ्या. त्यानंतर पुढे क्लिक करा तुमचे पोस्ट ऑफिस कोणतं आहे ते लिहा. यानंतर तुम्ही तुमचा पिन कोड टाका. आता तुम्हाला तुमचा ॲड्रेस प्रूफ निवडावा लागेल. अशा रीतीने तुमचे मतदान ओळखपत्र तयार होते.
दरम्यान ही गोष्ट लक्षात ठेवा की, या सर्व प्रक्रियेत तुम्हाला कोणतेच पैसे मोजावे लागत नाहीत. ही संपूर्ण प्रोसेस पूर्णपणे विनामूल्य आहे.