AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बँका आपल्याकडे कॅन्सल चेक का मागतात? त्यामुळे काही नुकसान होऊ शकते का?

बँकांसोबत कोणतेही आर्थिक व्यवहार करताना बँक आपल्याकडे कॅन्सल चेक का मागतात. कॅन्सल चेक घेण्यामागचा उद्देश काय असतो. जाणून घ्या.

बँका आपल्याकडे कॅन्सल चेक का मागतात? त्यामुळे काही नुकसान होऊ शकते का?
| Updated on: May 09, 2023 | 11:01 PM
Share

मुंबई : कोणतेही कर्ज घेताना किंवा आर्थिक गोष्टी खरेदी करताना बँक आपल्याकडे कॅन्सल चेक मागतात. आपण तो सहजपणे देतो. पण तुम्हाला माहित आहे का की बँका तुमच्याकडून कॅन्सल चेक ( Cancelled Cheque ) का मागतात. हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच पडला असेल. तर चला मग जाणून घेऊया या मागचं कारण?

कॅन्सल चेक म्हणजे काय?

जेव्हा आपण बँकासोबत व्यवहार करतो तेव्हा वित्तीय सेवा प्रदाता कंपनी किंवा बँक आपल्याकडे रद्द केलेला चेक म्हणजेच कॅन्सल चेक मागते. त्या चेकवर मग आपण क्रॉस दोन रेषा मारुन त्यामध्ये कॅन्सल असं लिहून देतो.

बँका का मागतात कॅन्सल चेक?

ग्राहकाच्या तपशीलाची पडताळणी करण्यासाठी बँक आणि वित्तीय कंपन्या कॅन्सल चेक मागतात. कारण चेकवर ग्राहकाचे सर्व तपशील दिलेले असतात. जसे की बँक खाते क्रमांक, IFSC कोड, पूर्ण नाव आणि स्वाक्षरी. जेणेकरून ग्राहकाचा तपशील सहजपण बँकांना पडताळणे सोपे होते.

कॅन्सल चेकने पैसे काढता येतात का?

रद्द केलेल्या चेकने तुमच्या खात्यातून कोणतीही रक्कम काढता येणार नाही. चेकवर क्रॉस मार्क योग्यरित्या करण्यासाठी तुम्हाला याची पूर्ण काळजी घ्यावी लागेल. रद्द केलेल्या चेकसाठी नेहमी निळ्या आणि काळ्या शाईचा पेन वापरावा.

रद्द केलेल्या चेकची गरज कुठे-कुठे आहे

विमा खरेदी करताना. डिमॅट खाते उघडण्याच्या वेळी. पीएफमधून ऑनलाइन पैसे काढताना. कोणतेही आर्थिक उत्पादन खरेदी करणे. NPS मध्ये गुंतवणूक करताना.

सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.