AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ATM Card : कोणतं एटीएम कार्ड भारी! Platinum की Titanium

ATM Card : एटीएम कार्डचं मार्केट फार मोठं आहे. कोणतं एटीएम कार्ड भारी आहे, असा प्रश्न ग्राहकांना पडतो. Platinum की Titanium यापैकी कोणतं कार्ड जोरदार आहे, चला तर फायदे जाणून घेऊयात...

ATM Card : कोणतं एटीएम कार्ड भारी! Platinum की Titanium
| Updated on: Apr 14, 2023 | 11:18 AM
Share

नवी दिल्ली : जगभरात डिजिटल पेमेंटचे प्रचलन वाढत आहे. विविध डेबिट कार्ड (Debit Card) आणि क्रेडिट कार्डची (Credit Card) बाजारात रेलचेल आहे. लोक त्यांच्या गरजेनुसार, नाहीतर बँक खाते उघडताना देईल ते कार्ड बाजारात त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरतात. बँकेत खाते उघडल्याबरोबर ग्राहकांना डेबिट कार्ड देण्यात येते. डेबिट आणि क्रेडिट कार्डमध्ये अनेक प्रकार आहे, तुमच्या गरजेनुसार, ते निवडू शकता. क्रेडिट वा डेबिट कार्ड घेताना कोणता पर्याय निवडायचा हे ग्राहकाला निश्चित करता येते. त्यानुसार, तुम्हाला फायदा मिळतो. स्वदेशी पेमेंट नेटवर्क रुपे कार्ड (RuPay Card) पण ग्राहकांना 3 प्रकारचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड देते.

Visa Card चे वेगवेगळे प्रकार जगात सर्वात जास्त पेमेंट नेटवर्क व्हिसा आहे. बँकेसोबत व्हिसा भागीदारीत अनेक कार्ड जारी करते.

  1. क्लासिक कार्ड- हे एक बेसिक कार्ड आहे. या कार्डवर जगभरात जवळपास सर्वच सुविधा मिळतात. हे कार्ड कोणत्याही वेळी बदलता येते. तसेच हे कार्ड अपग्रेड करता येते.
  2. गोल्ड कार्ड- जर तुमच्याकडे गोल्ड व्हिसा कार्ड (Gold Visa Card) असेल तर पर्यटन आणि सफारीचा आनंद लुटता येतो. हे कार्ड जगभरात वापरता येते. हे कार्ड ग्लोबल नेटवर्कशी जोडण्यात येते. या कार्डचा रिटेल, डायनिंगक आणि इंटरटेनमेंट आऊटलेट वर स्वाईप केल्यावर अनेक सवलती मिळतात.
  3. प्लॅटिनम कार्ड- या कार्डवर ग्राहकांना कॅशबँकचा फायदा मिळतो. हे कार्ड पण ग्लोबल एटीएम नेटवर्क सुविधा देते. याशिवाय मेडिकल आणि लिगल रेफरल फायदा मिळतो. या कार्डच्या वापरामुळे अनेक करार, सवलती, ऑफर आणि इतर सुविधा मिळतात.
  4. टायटेनिम कार्ड- टायटेनियम कार्डमध्ये क्रेडिट लिमिट प्लॅटिनम कार्डच्या तुलनेत अधिक असते. सर्वसाधारणपणे क्रेडिट हिस्ट्री आणि चांगली कमाई असणाऱ्या लोकांना हे कार्ड सहज मिळते.
  5. सिग्नेचर कार्ड- सिग्नेचर कार्डमध्ये एअरपोर्ट लाऊंज ॲक्सेस यासह अनेक सुविधा कार्डधारकांना मिळतात. या कार्डमध्ये अधिक सुविधा असतात. त्याचा जगात अनेक ठिकाणी वापर करता येतो.

मास्टरकार्ड पेमेंट नेटवर्क मास्टरकार्डचे (MasterCard) तीन प्रकारचे डेबिट कार्ड एकदम लोकप्रिय आहे. हे तीन डेबिट कार्ड आहेत. Standard Debit Card, Enhanced Debit Card आणि World Debit MasterCard. तुम्ही बँकेत खाते उघडल्यानंतर बँकेकडून तुम्हाला स्टँडर्ड डेबिट कार्ड देण्यात येते.

तीन प्रकारचे RuPay Card स्वदेशी पेमेंट नेटवर्क रुपे कार्ड (RuPay Card) पण ग्राहकांना 3 प्रकारचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड देते. यामध्ये Classic, Platinum आणि Select Card चा समावेश आहे.

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.