Internet Down: इंटरनेट वारंवार का डाऊन होते, जाणून घ्या कारणे?

Internet down | इंटरनेट आऊटेजच्या या समस्येचा सामना गुगलसारख्या बड्या कंपनीलाही करावा लागत आहे. यासाठी अनेक कारणे असू शकतात. कंजेशन, केबल डिर्स्टबन्स, स्पीड फ्लक्चुएशन यापैकी कोणत्याही कारणामुळे इंटरनेट आऊटेज होऊ शकते.

Internet Down: इंटरनेट वारंवार का डाऊन होते, जाणून घ्या कारणे?
इंटरनेट डाऊन
Follow us
| Updated on: Jul 23, 2021 | 7:08 AM

मुंबई: जगातील प्रमुख वेबसाईट आणि अ‍ॅप्स गुरुवारी रात्री ठप्प होण्याचा प्रकार घडला. अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मसवरही कंटेट लोड येण्यात अडचणी येत होत्या. यासाठी इंटरनेट कनेक्शन डाऊन होण्याचे कारण सांगितले जात आहे. त्यामुळे बँकांचे अ‍ॅप्स आणि पेटीएमसारख्या सुविधाही काही काळ बंद होत्या.

डोमेन नेम सिस्टिममध्ये गडबड झाल्यामुळे ही समस्या उद्भवल्याची माहिती समोर आली आहे. हा तांत्रिक बिघाड दूर करण्यात आला आहे. क्लाउड सर्विस प्रोवाइडर कंपनी अकामाई टेक्नोलॉजीज (AKAM.O) कंपनीने DNS मधील बिघाड दूर झाल्याचे ट्विटही केले होते. इंटरनेट आऊटेजच्या या समस्येचा सामना गुगलसारख्या बड्या कंपनीलाही करावा लागत आहे. यासाठी अनेक कारणे असू शकतात. कंजेशन, केबल डिर्स्टबन्स, स्पीड फ्लक्चुएशन यापैकी कोणत्याही कारणामुळे इंटरनेट आऊटेज होऊ शकते.

नेटर्वक कंजेशन

इंटरनेट आऊटेजसाठी नेटवर्क कंजेशन हे प्रमुख कारण मानले जाते. एकाचवेळी अनेकजण एकाच नेटवर्कचा वापर करत असतील तर ही समस्या निर्माण होते. नेटवर्क कंजेशनमुळे सर्किट क्वालिटी खराब होते. गर्दीच्या ठिकाणी नेहमी ही समस्या उद्भवते.

लिंक फेल होणे

डिव्हाईस आणि सर्व्हरमधील लिंक खंडित होते तेव्हा ही समस्या उद्भवते. अनेकदा वादळ किंवा अन्य कारणांमुळे केबल तुटतात. त्यामुळे सर्व्हिस प्रोव्हायडर लिंक फेल होते. त्यामुळे इंटरनेट आऊटेज होणे ही एक सामान्य बाब आहे.

स्पीड फ्लक्चुएशन

सर्व्हिस प्रोयाव्हडरकडून देण्यात येणाऱ्या इंटरनेट स्पीडमध्ये चढउतार होत असतील तरीही इंटरनेट आऊटेज होऊ शकते. तुम्ही 500 MBPS चे कनेक्शन घेतले आणि तुम्हाला 50 MBPS चा स्पीड मिळत असेल तर ते स्पीड फ्लक्चुएशन मानले जाते.

उपकरणांमध्ये बिघाड

काहीवेळा सर्व्हिस प्रोयाव्हडरकडून इंटरनेट सुविधा पुरवणारी उपकरणे व्यवस्थित बसवली जात नाहीत. त्यामुळे सर्किटस खराब होऊन इंटरनेटसेवा खंडित होऊ शकते. त्यासाठी चांगल्या दर्जाची उपकरणे वापरणे गरजेचे आहे.

ऑपरेशन एरर

चुकीचा आयपी अ‍ॅड्रेस, सदोष वायरिंग किंवा फायरवॉल चुकीच्या पद्धतीने कॉन्फिगर केल्यास इंटरनेट आउटेज होऊ शकते. हा भाग ऑपरेशन एररमध्ये मोडतो.

इतर बातम्या

महिलांना ‘या’ सरकारी योजनेतून रोजगार मिळणार, दरमहा 4 हजार कमावण्याची संधी, पटापट जाणून घ्या

ATM rules 2021: रोख रक्कम काढणे, व्यवहारांवरील शुल्कात लवकरच बदल, जाणून घ्या

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.