AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसी चालवताना पावसाळ्यात Dry Mode वापरणे का आवश्यक?

पावसाळ्यात एसीचा वापर करताना Dry Mode वापरणं हेच सर्वात योग्य ठरतं. हे नुसतंच विजेची बचत करतं असं नाही, तर घरातील ओलसर वातावरण कमी करतं आणि आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतं. Cool Mode फक्त तापमान कमी करतं, पण Dry Mode हवेतील दमटपणा कमी करतं आणि पावसाळ्यात याचीच गरज अधिक असते. त्यामुळे पुढच्यावेळी तुम्ही एसी चालू करत असाल, तर Dry Mode नक्की वापरून पाहा!

एसी चालवताना पावसाळ्यात Dry Mode वापरणे का आवश्यक?
ac
| Edited By: | Updated on: May 31, 2025 | 3:16 PM
Share

पावसाळा सुरू झाला की वातावरणात दमटपणा वाढतो, हवामान थोडं थंड होतं, पण तरीही घरात उष्मा जाणवतो. याच कारणामुळे अनेक घरांमध्ये एसी (Air Conditioner) वापरणं सुरूच राहतं. मात्र, उन्हाळ्याच्या तुलनेत पावसाळ्यात एसी कसा वापरावा, कोणता मोड योग्य असतो, याबद्दल अनेकांना संभ्रम असतो. चुकीच्या पद्धतीने एसी वापरल्यास वीजेचा अतिरिक्त खर्च होतोच, पण आरोग्यावरही त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.

पावसाळ्यातील हवामान आणि AC वापर

पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता (Humidity) खूप वाढलेली असते. त्यामुळे जरी तापमान तुलनेने कमी असलं, तरी त्वचेला चिकटपणा जाणवतो, घाम जास्त येतो आणि घरात भिजटपणा जाणवतो. यामुळे एसी वापरणं गरजेचं वाटतं, परंतु उन्हाळ्यासारखा cool mode वापरणं पावसाळ्यात तितकंसं फायदेशीर ठरत नाही.

“Dry Mode”

नेहमीच्या Cool Mode मध्ये AC सतत तापमान कमी करत राहतो, पण पावसाळ्यातील दमट हवामानात हाच मोड जास्त विजेचा वापर करतो आणि हवेतील आर्द्रतेवर प्रभाव टाकत नाही. याऐवजी “Dry Mode” वापरणं अधिक फायदेशीर ठरतं.

Dry Mode हा मोड विशेषतः आर्द्रता कमी करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. या मोडमध्ये एसी तापमान जास्त न बदलता, फक्त हवेतील ओलावा (moisture) कमी करतो. त्यामुळे घरात कोरडेपणा जाणवतो आणि वातावरण अधिक आरामदायक होतं. यामध्ये कंप्रेसरही सतत चालू राहत नाही, त्यामुळे विजेची बचत होते.

Dry Mode कसा ओळखाल?

Dry Mode चा सिम्बॉल प्रामुख्याने एसीच्या रिमोटवर पाण्याच्या थेंबासारखा दिसतो. सर्व ब्रँड्समध्ये तो ठराविक स्वरूपाचा नसला, तरी ‘Dry’ किंवा ‘Dehumidifier’ असं लिहिलेलं असतं. एकदा हा मोड निवडल्यावर एसी काही वेळात घरातील आर्द्रता कमी करतो आणि हवामान सुखद बनवतो.

Dry Mode चा आणखी एक फायदा म्हणजे आरोग्यवर्धक वातावरण. दमट हवेमुळे घरात बुरशी (fungus), साचा (mold), किंवा दमट वास निर्माण होतो. Dry Mode याविरोधात प्रभावी ठरतो, कारण तो हवेतील ओलावा शोषून घेतो आणि अशा बॅक्टेरिया वाढण्यास अडथळा आणतो.

वापरताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी:

1. Dry Mode फक्त आर्द्रता कमी करतो, त्यामुळे तो खूप उष्णतेच्या दिवसांमध्ये उपयोगी ठरत नाही.

2. एकाच खोलीत दररोज काही तास वापरणं हे पुरेसं असतं.

3. खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवणं महत्त्वाचं आहे, अन्यथा बाहेरून पुन्हा आर्द्रता आत येऊ शकते.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.