Special Report | मुंबईत भरदिवसा 2 महिन्याच्या मुलीचं अपहरण

मुंबईत (Mumbai) भांडी विकणाऱ्या महिलेची दहशत सध्या पाहायला मिळत आहे. जुना मोबाईलच्या बदल्यात नवी भांडी विकण्यासाठी आलेल्या महिलेने तीन महिन्याच्या मुलीला पळवल्याची (Woman Thief) घटना काळा चौकी परिसरात घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

मुंबई : मुंबईत (Mumbai) भांडी विकणाऱ्या महिलेची दहशत सध्या पाहायला मिळत आहे. जुना मोबाईलच्या बदल्यात नवी भांडी विकण्यासाठी आलेल्या महिलेने तीन महिन्याच्या मुलीला पळवल्याची (Woman Thief) घटना काळा चौकी परिसरात घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस बाळ चोरणाऱ्या महिलेचा शोध घेत आहेत.

आईचा नाकाला गुंगीचं औषध लावून बाळ घेऊन पसार

मंगळवारी 30 नोव्हेंबरला सपना बजरंग मगदूम (वय – 36) या त्यांच्या तीन महिन्यांच्या मुलीसोबत घरात होत्या. यावेळी एक 30-35 वर्षांची अनोळखी महिला त्यांच्या घरी आली. ती जुन्या मोबाईलच्या बदल्यात कपडे ठेवण्याची बास्केट विकण्यासाठी आल्याचं तिने महिलेला सांगितलं.

महिलेला ती बास्केट घ्यायची होती. त्यामुळे ती जुने मोबाईल घेण्यासाठी आतील खोलीत गेली. तेव्हा या महिलेने मागून येत अगदी फिल्मी स्टाईलने महिलेच्या नाकाला गुंगीचं औषध लावलं. त्यानंतर महिला बेशुद्ध पडली. तेव्हा आरोपी महिलेने पलंगावरील 3 महिने 15 दिवसांच्या मुलीचे अपहरण केले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI