Pakistan मध्येच पाक दहशतवाद्यांचाच काटा काढणं सुरू, ‘ऑपरेशन अज्ञात’ची चर्चा, वाँटेड अतिरेक्यांचा खात्मा करणारे कोण?
पाकिस्तानमध्ये सध्या अज्ञात ऑपरेशन सुरू असल्याचं दिसतेय. कारण आहे वाँटेड दहशतवाद्यांना त्या अज्ञातांकडून गोळ्या घातल्या जात आहेत. गेल्या काही महिन्यातला हा आकडा आता सोळावर गेलाय.
पाकिस्तानात सध्या अज्ञात हल्लेखोरांकडून मोठमोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा सुरू आहे. तीन महिन्यात तीन वाँटेड दहशतवाद्यांना पाकिस्तानात गोळ्या घालून ठार करण्यात आलं. तर दोन वर्षात हा आकडा सोळावर गेलाय. लष्कर ए तैयबाचा दहशतवादी अबू सैफुल्ला, लष्कर ए तैयबाचा अबू कटाल आणि जमियत उलेमाचा मुफ्ती शहा मीर या तिघांनाही तीन महिन्यात यमसदनी पाठवण्यात आलाय. त्यामुळे पाकिस्तानात पाकिस्तानी दहशतवाद्यांचाच काटा काढणं सुरू आहे.
लष्कर ए तैयबाचा अतिरेकी अबू सैफुल्लाला रविवारी अज्ञातांनी गोळ्या घातल्या. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात अज्ञात हल्लेखोरांनं सैफुल्लावर गोळ्या झाडल्यात. हाफिज सईदचा निकटवर्तीय अबू कटाल यालाही 15 मार्चला अज्ञातांन गोळ्या झाडल्यात. अबू कटालनं जम्मू काश्मीरात अनेक हल्ल्यांचे कट रचले होते. काश्मीरमध्ये यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या हल्ल्यातही कटालचा सहभाग होता. बसवर झालेल्या हल्ल्यात दहा पर्यटकांचा मृत्यू झाला होता. 14 मार्चला बलुचिस्तानात मुफ्ती शहा मीरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. कुलाभूषण जाधवांच अपहरण करण्यात मुफ्ती शहा मीरनं आयएसआय ला मदत केली होती. मुफ्ती शहा मीर नमाजानंतर मशिदीतून बाहेर पडत असताना अज्ञातांनी गोळीबार करून त्याची हत्या केली.