India-Pakistan Conflict : भारताला साथ अन् पाकचं पाणी अडवण्यासाठी तालिबान लागलं कामाला, बघा कसं सुरू प्लानिंग?
भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर मुत्ताकी यांच्याशी चर्चा केली. भारत-पाकिस्तानच्या तणावाच्या दरम्यान भारत पहिल्यांदाच तालिबानशी बोललाय. राजकीय स्तरावर आतापर्यंत भारताचा तालिबान सरकारशी संपर्क नव्हता. पण पहिल्यांदाच अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार आल्यावर भारताने राजनैतिक स्तरावर संपर्क केलाय
पाकिस्तानची आणखी पाणीकोंडी करण्यासाठी तालिबान आता कामाला लागलं असल्याचे पाहायला मिळत आहे. तालिबानच्या अधिकाऱ्यांकडून पाकिस्तानला जाणाऱ्या पाण्याची पाहणी करण्यात आली आहे. तालिबानच्या अधिकाऱ्यांनी कुनार भागात ही पाहणी केल्याची माहिती मिळतेय. अफगाणिस्तानमध्ये असणाऱ्या कुनार नदीवर आणि काबुल नद्यांवर तालिबान धरण बांधणार असून पाकिस्तानची पाणीकोंडी करणार असल्याचे दिसून येतंय. अफगाणिस्तानमध्ये असणाऱ्या कुनार आणि काबुल नदीवर धरण बांधल्याने पाकिस्तानला पाणी जाऊ शकणार नाही. पाणी आमच्यासाठी रक्त आहे ते धमण्यांबाहेर वाहू देणार नाही. तर अफगाणिस्तानातील पाकिस्तानला जाणारे पाणी आडवा, असं वक्तव्य तालिबानी सैन्याचे जनरल मुबीन यांनी म्हटलंय. दरम्यान, भारताने सिंधू जल करार स्थगित करून पाकिस्तानचं पाणी बंद केलं त्यामुळेच पाकिस्तानमध्ये जलसंकट निर्माण होणार आहे. त्यातच आता अफगाणिस्तानमधून पाकिस्तानात जाणारं पाणीही भारत कुटनीतीने थांबवणार आहे.