4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 8 September 2021

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 8 September 2021

| Edited By: | Updated on: Sep 08, 2021 | 7:47 AM

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या तसेच कोरोनाची तिसरी लाट या बाबी लक्षात घेता मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी गणेशोत्सव तसेच आगामी सण साधेपणाने साजरे करण्याची गरज व्यक्त केली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. हे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती घालत आहे. यांना घरात बसायचं आहे, अशी घणाघाती टीका राणे यांनी केलीय.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या तसेच कोरोनाची तिसरी लाट या बाबी लक्षात घेता मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी गणेशोत्सव तसेच आगामी सण साधेपणाने साजरे करण्याची गरज व्यक्त केली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. हे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती घालत आहे. यांना घरात बसायचं आहे, अशी घणाघाती टीका राणे यांनी केलीय. तसेच हिंदूंच्याच सणांना बंदी का ? असा रोखठोक सवालही त्यांनी ठाकरे सरकारला केलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे 9 ऑक्टोबर रोजी उद्घाटन होईल. केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. याबाबात माहिती देताना नारायण राणे पत्रकारांशी मुंबईत बोलत होते. यावेळी बोलत असाताना त्यांनी वरील भाष्य केले.