AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aditya Thackeray :15 ते 16 आमदार शिवसेनेच्या संपर्कात, बंडखोर, गद्दारांना क्षमा नाही, आदित्य ठाकरेंनी ठणकावलं

Aditya Thackeray :15 ते 16 आमदार शिवसेनेच्या संपर्कात, बंडखोर, गद्दारांना क्षमा नाही, आदित्य ठाकरेंनी ठणकावलं

| Edited By: | Updated on: Jun 26, 2022 | 3:01 PM
Share

संदिपान भुमरे, संजय शिरसाट, जैस्वाल यांना मोठा फंड देण्यात आला असा खळबळजनक दावाही आदित्य यांनी भाषणात केला आहे. धनुष्य बाण हे चिन्ह आपल्याकडेच राहणार. शिवसेनेवरचे प्रेम आपलेच राहणार असे म्हणत आदित्य ठाकरेंनी यांनी एकनाथ शिंदेनी स्थापन केलेल्या नविन गटाच्या वैधतेबाबतही भाष्य केले आहे.

मुंबई : ‘15 ते 16 आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत. मात्र, बंडखोर, गद्दारांना क्षमा नाही,’ असेही आदित्य ठाकरेंनी ठणकावलंय. एकनाथ शिंदेचे बंड मोडून तोडून टाकण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह युवा नेते आदित्य ठाकरेही मैदानात उतरले आहेत. 20 मे रोजी एकनाथ शिंदेंना शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का? असे स्वत: पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी विचारले होते,’ असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंनी(uddhav thackeray) शनिवारी एकनाथ शिंदेचा(Eknath Shinde) बाप काढला होता. यानंतर आता आदित्य ठाकरेंनी तर हे बंड मोडित काढण्याची प्रतिज्ञाच केली आहे. आदित्य ठाकरे यांनी केलेले दमदार भाषण चांगलेच चर्चेत आले आहे.

Published on: Jun 26, 2022 03:01 PM