धक्कादायक! फक्त 3 हजारांसाठी सावकाराकडून शेतकऱ्याची हत्या
हे प्रकरण ताजे असतानाच लातूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या तीन हजार रुपयांच्या वसूलीसाठी आणखी एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. लातूरमधील रेणापूरमध्ये ही संतापजनक घटना घडली.
लातूर : राज्यात सध्या दलितांच्या हत्या होत असल्याच्या घटना समोर येत आहे. नांदेडच्या बोंढार गावात जातीयवाद्यांनी वरातीत आल्याच्या कारणावरून एका तरूणाची हत्या केली. हे प्रकरण ताजे असतानाच लातूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या तीन हजार रुपयांच्या वसूलीसाठी आणखी एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. लातूरमधील रेणापूरमध्ये ही संतापजनक घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपीना अटक करून पुढील कार्यवाही सुरुवात केली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, रेणापूर येथील गिरिधारी तपघाले यांनी गावातल्याच एका व्याजीबट्टी करणाऱ्या व्यक्तीकडून कौटूंबिक गरजेपोटी तीन हजार रुपये घेतले होते. तीन हजार रुपयाचे चक्रदरवाढ व्याजा प्रमाणे आरोपी लक्ष्मण मरकड हा वीस हजार रुपये मागत होता. त्यावरून वाद होऊन गिरिधीरा याना बेदम मारहाण करण्यात आली. जखमी झालेल्या गिरिधारी यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. कुटूंबाच्या प्रमुखाची हत्या झाल्याने त्यांची तिने मुले, पत्नी आणि वृद्ध आई, भितीच्या सावटाखाली वावरत आहेत.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

