शिवतीर्थवर अमित ठाकरेंच्या बर्थडेचे जंगी सेलिब्रेशन! आदित्य ठाकरेंनी घेतली गळाभेट, त्या केकची होतेय चर्चा

शिवतीर्थवर अमित ठाकरेंच्या बर्थडेचे जंगी सेलिब्रेशन! आदित्य ठाकरेंनी घेतली गळाभेट, त्या केकची होतेय चर्चा

| Updated on: May 24, 2026 | 1:18 PM

मनसे नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज शिवतीर्थावर राजकीय आणि कौटुंबिक वातावरण पाहायला मिळालं. उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिवतीर्थावर जाऊन अमित ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी दोन्ही युवा नेते पुन्हा एकदा एकाच फ्रेममध्ये दिसल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

गेल्या वर्षापासून मराठी भाषेच्या मुद्द्यावर मनसे आणि उद्धव ठाकरे गट एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यानंतर विविध कौटुंबिक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसले होते. आता अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या भेटीनेही चर्चांना आणखी वेग आला आहे.
दरम्यान, अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी खास केक आणला होता. या केकवर “NEET हटवा, देश वाचवा” असा संदेश लिहिण्यात आला होता. देशभरात गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हा संदेश चर्चेचा विषय ठरला आहे.
राज ठाकरे यांनी यापूर्वी NEET प्रकरणावर सरकारवर टीका करत सोशल मीडियावर भूमिका मांडली होती. तसेच अमित ठाकरे यांनीही या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली होती. वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं.

Published on: May 24, 2026 1:17 PM
Follow Us