“स्वत: ला समजतोस कोण, असे 100 सलमान खान गल्ली झाडायला उभे करेन”

| Updated on: Jan 25, 2022 | 7:47 PM

असले 100 सलमान मी गल्ली झाडायला उभे करेन. दुसरं कुणी मोठं होत असेल तर ते सलमानला बघवत नाही, असं बिचुकले म्हणाले आहेत. सलमान खान स्वत:ला भाई समजतो, पण मी दादा आहे, असा संताप बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर बिचकुलेंनी व्यक्त केलाय.

Follow us on

मुंबई : बिग बॉसच्या (Bigg Boss 15) घरातून बाहेर पडल्यानंतर कॉन्ट्रव्हर्सी किंग बिचुकले (abhijit bichukale) यांनी बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या (salman khan) विरोधात संताप व्यक्त केला आहे. असले 100 सलमान मी गल्ली झाडायला उभे करेन. दुसरं कुणी मोठं होत असेल तर ते सलमानला बघवत नाही, असं बिचुकले म्हणाले आहेत. सलमान खान स्वत:ला भाई समजतो, पण मी दादा आहे, असा संताप बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर बिचकुलेंनी व्यक्त केलाय.