Abu Azami News : औरंगजेबाचा उदोउदो करणं भोवलं; अबू आझमीच्या निलंबनाचा ठराव मंजूर
MLA Abu Azami Controversial Statement : औरंगजेबाचं कौतुक करणं आमदार अबू आझमी यांना चांगलंच भोवलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज त्यांच्या निलंबनाचा ठराव मंजूर झाला आहे.
समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांना अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलेलं आहे. औरंगजेबावर केलेलं वक्तव्य त्यांना भोवलं असून त्यांच्यावर निळंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. चंद्रकांत पाटील यांनी अबू आझमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव देखील मांडला आहे.
अबू आझमी यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत औरंगजेब हा एक उत्तम प्रशासक असल्याचं वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरांतून टीका होत होती. त्यानंतर आज अधिवेशनात चंद्रकांत पाटील यांनी आझमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर आमदार अबू आझमी यांचं निलंबन करण्यात आलं आहे. अबू आझमी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना औरंगजेब उत्तम प्रशासक होता, असं त्याची भलामण करणारे आणि छत्रपती संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. ही त्यांची वक्तव्ये आक्षेपार्ह आहेत. त्यांची वक्तव्यं निषेधार्ह आहेत. यामुळे सभागृहाचा अपमान झाला आहे. त्यामुळे अबू आझमी यांचं सदस्यत्व अर्थसंकल्प अधिवेशनाच्या शेवटच्या तारखेपर्यंत निलंबन करावे, असं यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी म्हंटलं.

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल

ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान

सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती

'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
