Ajit Pawar : आता तयारीला लागा… लोकसभेतील पराभवानंतर अजित पवार यांनी आमदारांना काय दिले आदेश?
लोकसभा निकालाच्या पराभवानंतर या निकालाचे चिंतन करण्यासाठी अजित पवार गट अर्थात राष्ट्रवादीच्या आमदरांची राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक बैठक बोलावली होती. या आमदारांच्या बैठकीत अजित पवार यांनी आदेश दिले आहेत. काय दिले आमदारांना या बैठकीत आदेश बघा व्हिडीओ...
लोकसभा निवडणुकीच्या पराभवाने खचून न जाता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेशच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. पराभव झाला तरी चालेल पण अजित पवारांची साथ सोडणार नाही, असा आमदारांनी एकमताने निर्धारही व्यक्त केला. तर कोणीही शरद पवार यांच्या संपर्कात नसल्याची ग्वाही देखील आमदारांनी या बैठकीत दिल्याचे पाहायला मिळाले. लोकसभा निकालाच्या पराभवानंतर या निकालाचे चिंतन करण्यासाठी अजित पवार गट अर्थात राष्ट्रवादीच्या आमदरांची अजित पवार यांनी एक बैठक बोलावली होती. या आमदारांच्या बैठकीत अजित पवार यांनी आदेश दिले आहेत. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार हे दोन दिवस मुंबईत तर पाच दिवस बारामतीत असणार आहे, अशी माहितीही मिळतेय.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

