आदर्श घोटाळ्याचं काय झालं? भर पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण यांना कोंडीत अडकवण्याचा प्रयत्न
अशोक चव्हाण यांचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक गोष्टींरवर भाष्य केले. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी अशोक चव्हाण यांना आदर्श घोटाळ्यांवरून प्रश्न विचारला.....
मुंबई, १३ फेब्रुवारी २०२४ : अशोक चव्हाण यांचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक गोष्टींरवर भाष्य केले. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी अशोक चव्हाण यांना आदर्श घोटाळ्यांवरून प्रश्न विचारला आणि त्यांना कोंडीत अडकवण्याचा प्रयत्न केला. यावर अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर देत म्हटले, आदर्श घोटाळ्याचा प्रश्न उशिरा आला. पहिलाच विचारायला हवं. हायकोर्टात आमच्या बाजूने निकाल लागला आहे. तो राजकीय अपघात होता. कोर्टात प्रकरण चालू आहे. चिंतेचा विषय वाटत नाही. यानंतर नाना पटोले यांनी केलेल्या एका ट्वीट संदर्भात अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांना सवाल करण्यात आला. यावरही देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत फटकारल्याचे पाहायला मिळाले. फडणवीस म्हणाले, नाना पटोले यांना आम्ही प्रवेश दिला होता. त्यांची सवय आहे, ते एका पदावर टिकत नाही. एका ठिकाणी राहत नाहीत. त्यांना गांभीर्याने घेऊ नका, असे म्हणत खोचक टोलाही लगावला.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

