Cabiet Meeting : वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव, मुलींचे स्वतंत्र आयटीआय; मुख्यमंत्र्यांची घोषणा
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त आज फडणवीस सरकारने अहिल्यानगरच्या चौंडीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली. यात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त फडणवीस सरकारने प्रथमच अहिल्यानगरच्या चौंडीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे आयोजन केलंय. आजच्या या ऐतिहासिक कॅबिनेट बैठकीच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय महत्वाच्या निर्णयांची घोषणा केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणार असल्याची घोषणा ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली आहे. सोबतच मुलींचे स्वतंत्र आयटीआय देखील असेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्याचबरोबर चौंडीला स्मृतीस्थळाच्या जतन आणि संवर्धन करण्यासाठी 681 कोटी रुपयांचा आराखडा मान्य करण्यात आलेला आहे.
Published on: May 06, 2025 04:28 PM
Latest Videos

फायदा करून देणार 100 टक्के... दमानियांचा सुपेकरांवर आरोप, ऐकवली ऑडिओ

वैष्णवीकडून 2 वर्षांपूर्वीच आत्महत्येचा प्रयत्न, कीटकनाशक पिऊन...

सासऱ्यानं सूनेच्या छातीवर...मयुरीच्या आईच 7 महिन्यापूर्वी आयोगाला पत्र

नुसता माज, सौंदर्य पाहून पद..चाकणकरांवर करूणा शर्मा भडकल्या दिला इशारा
