Air India Plane Crash : PM मोदींनी अहमदाबादच्या दुर्घटनास्थळाची केली पाहणी अन्..
पंतप्रधान मोदींचा ताफा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचला, जिथे पंतप्रधानांनी जखमींची भेट घेतली. विमान मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळले. त्यामुळे अनेक लोक जखमी झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी अहमदाबादला दाखल होत त्यांनी एअर इंडिया विमानाच्या अपघातग्रस्त ठिकाणी पोहोचले. पंतप्रधानांनी परिस्थितीचा आढावा घेतला यासह दुर्घटनास्थळाची पाहणी केली आणि नंतर जखमींची भेट घेतली. अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाणारे विमान गुरुवारी अचानक कोसळले. या भीषण अपघातात २६५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पंतप्रधान मोदी आज सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर दाखल झालेत आणि तेथून ते थेट मेघानी नगर परिसरातील अपघातस्थळी गेले. मेघानी नगर हा तोच निवासी परिसर होता जिथे हे विमान कोसळले आणि मोठी दुर्घटना घडली.
पंतप्रधान मोदींचा ताफा प्रथम घटनास्थळी पोहोचला. जिथे पंतप्रधान मोदींनी परिस्थितीचा आढावा घेतला. घटनास्थळी पोहोचल्यानंतर मोदींनी अपघाताबद्दल सर्व माहिती गोळा केली. दुर्घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर, पंतप्रधान मोदी जखमींना भेटण्यासाठी रुग्णालयात रवाना झाले. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल देखील पंतप्रधानांसोबत उपस्थित होते.

भ्रष्टाचार वाढला आहे, अण्णा हजारेंना उठवायची गरज; संजय राऊतांची टीका

लोणावळ्याचा फेमस वडापाव तुम्ही खाताय? थांबा, कारण उंदरांनी चावलेल्या..

टेस्लाची भारतात दमदार एन्ट्री, मुंबईतील पहिल्या शोरूमची पाटी मराठीत

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांना लाथा-बुक्क्यांनी तुडवल, बघा VIDEO
