अजितदादांनी ‘या’ मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
गेल्या दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर आज जड अंतःकरणाने भाविक आपल्या गणरायाची पाठवणी करत आहे. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये आज उत्साहाचं जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच दादांनी चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत वडापाव खाण्याचा आस्वाद घेतला.
राज्यभरात आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची तयारी सुरू आहे. मुंबईप्रमाणे पुण्यातही बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या असून नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. पुण्यातील दगडुशेठ हलवाई गणपती आणि मानाच्या पाच गणपतींची मोठ्या जल्लोषात मिरवणूक सुरू झाली आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील मानाच्या गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन विसर्जन मिरवणुकीचा आढावा घेतला आहे. यावेळी अजित पवारांनी मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत वडापाव खाण्याचा आस्वाद घेतला. पुण्यात आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मानाच्या गणपती बाप्पाची पूजा केली. यावेळी त्यांनी देवाकडे साकडंही घातलं. यानंतर राज्यासह पुण्यातील नागरिकांना शांततेत आणि आपली जबाबदारी पार पाडत विसर्जनात सहभागी होण्याचं आवाहन केलं.
Latest Videos
Latest News