चार पक्ष अन् सगळे दक्ष; सातारा लोकसभा एकच लक्ष्य, सातारा जागेवर कोणी सांगितला दावा?

चार पक्ष अन् सगळे दक्ष; सातारा लोकसभा एकच लक्ष्य, सातारा जागेवर कोणी सांगितला दावा?

Harshada Shinkar | Updated on: Dec 07, 2023 | 10:47 AM

शिंदे आणि भाजपच्या समर्थकांनी सुद्धा सातारा लोकसभेवर आपापल्या पक्षांची दावेदारी सांगितली आहे. मात्र साताऱ्यातील जागा अजित दादा गटाकडे गेली तर उदयनराजे भोसलेंचं काय होणार? याचीही चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई, ७ डिसेंबर २०२३ : सातारा लोकसभा आम्ही लढवणारच, अशी भूमिका अजित पवार गटाने घेतल्यानंतर आता साताऱ्यात त्यांच्या मित्र पक्षांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. शिंदे आणि भाजपच्या समर्थकांनी सुद्धा सातारा लोकसभेवर आपापल्या पक्षांची दावेदारी सांगितली आहे. मात्र साताऱ्यातील जागा अजित दादा गटाकडे गेली तर उदयनराजे भोसलेंचं काय होणार? याचीही चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या उदयनराजे भोसले यांनी अद्याप कोणतीच भूमिका जाहीर केली नाही. मात्र सत्तेत गेल्यानंतर अजित पवार गटाचे नेते रामराजे निंबाळकर साताऱ्याच्या जागेवरून नाव न घेता उदयनराजे यांना इशारा देत आलेत. त्यामुळे भाजप आणि अजित पवार गटातील समर्थकांध्ये वार-पलटवार सुरू झाले आहेत. तर २०१९ साली सातारा लोकसभेत कोणा विरूद्ध कोणी लढवली होती निवडणूक?

Published on: Dec 07, 2023 10:47 AM
Follow Us