Malegaon Sakhar Karkhana : माळेगाव साखर कारखान्याचा कारभारी कोण? मतमोजणीचा पहिला कल हाती
Ajit Pawar vs Chadrarao Taware : बारामतीच्या माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक पार पडल्यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
माळेगाव साखर कारखान्याच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिला कल आता हाती आला आहे. यात ब वर्ग गटातून अजित पवार सध्या आघाडीवर असल्याचं समजत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निळकंठेश्वर पॅनल हे आघाडीवर असल्याचं समोर आलं आहे. माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक ही पवारांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. यासाठी अजित पवार स्वत: गेल्या काही दिवसांपासून बारामतीत तळ ठोकून होते. मतदानाच्या दिवशी देखील अजित पवार यांनी सर्व गावातील बूथची पाहणी करून आढावा घेतला होता. अजित पवार यांना 85 वर्षांच्या चंद्राराव तावरे यांनी आव्हान दिलं आहे. तावरे हे माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत.
दरम्यान, माळेगाव साखर कारखान्याची सत्ता काबिज करण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह शरद पवारांचे जुने सहकारी चंद्रराव तावरे यांच आणि शेतकरी संघटनांच अशी मिळून चार पॅनेल्स मैदानात आहेत.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको

