सुनील तटकरेंनी केली भरत गोगावले यांची नक्कल, खांद्यावर रूमाल अन्… बघा व्हिडीओ
मंत्री भरत गोगावले यांच्या मुलीचं व्हॉट्सअप स्टेटस सध्या चांगलंच चर्चेत आलंय. सुनील तटकरे यांनी गोगावलेंवर केलेल्या टीकेला शीतल गोगावले यांनी उत्तर दिलंय.
रायगडच्या महाडमध्ये स्नेहल जगताप यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांची नक्कल केली असल्याचे पाहायला मिळाले. खांद्यावर रूमाल ठेवत आणि हात जोडून सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांची स्टाईल करून दाखवली आहे. सध्या सुनील तटकरे यांच्या भाषणातील तेवढाच नक्कल केलेला भाग व्हिडीओच्या माध्यमातून चांगलाच व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. महाड विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवलेल्या महाडच्या माजी नगराध्यक्षा तथा माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप यांनी शिवसेना ठाकरे पक्षाला रामराम करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.
स्नेहल जगताप यांनी काँग्रेसमधून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रवेश केला आणि विधानसभा लढवली. विधानसभा निवडणुकीत स्नेहल जगताप यांना 91 हजार 232 तर भरत गोगावले यांना 1 लाख 17 हजार 442 मते मिळाली. या निवडणुकीत 26 हजार 210 मतांनी गोगावले यांचा विजय झाल्याचे पाहायला मिळाले होते.

माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं पार्थिव कुटुंबाला सुपूर्द

... मग आमचं काय होणार? शाळेच्या पहिल्या दिवशी शिंदेंचा मुलांना सवाल

कुंडमळा पूल दुर्घटना; 6 वर्षांच्या चिमुकल्यासह चौघांचा मृत्यू

आकाशात असताना अचानक काय झालं की बोईंग 787-8 ड्रीमलायनर फिरलं माघारी?
