Ajit Pawar : पवार साहेबांनी अनेक वर्ष विकासकामं करण्याचा प्रयत्न केला; अजितदादांकडून पुन्हा एकदा काकाचं कौतुक
बारामतीत आयोजित सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांचं कौतुक करत त्यांनी अनेक वर्ष विकासकामं करण्याचा प्रयत्न केले असल्याचं म्हंटलं आहे.
पवार साहेबांनी अनेक वर्ष विकासकामं करण्याचा प्रयत्न केला, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यनीब म्हंटलं आहे. मी देखील माझ्या परीनं विकासकामं करण्याचा प्रयत्न केला, असंही अजित पवार यांनी म्हंटलं आहे. बारामतीच्या ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर आज अजित पवार आहेत. यावेळी आयोजित एका सभेत पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं आहे. राज्याचं, जिल्हयाचं भलं व्हावं हीच मनात भावना असते, असं देखील वक्तव्य अजितदादांनी केलं आहे. दरम्यान, त्यांच्या या कौतुकाच्या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.
Published on: Apr 13, 2025 02:44 PM
Latest Videos
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....

