Jay Pawar | अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; रोहित सिंगच्या अटकेची मागणी, जय पवारांचे ते विधान काय?

| Updated on: Apr 23, 2026 | 10:37 AM

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या विमान अपघातानंतर या प्रकरणाभोवतीचा वाद अद्याप कायम आहे. हा अपघात की घातपात, यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरूच असून तपास CID कडे आहे. या प्रकरणात आमदार रोहित पवार यांनी हा घातपात असल्याचा दावा केला आहे. तर आता जय पवार यांनीही मोठी मागणी करत व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांचा मुलगा रोहित सिंग याला तात्काळ अटक करावी, असं म्हटलं आहे.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या विमान अपघातानंतर या प्रकरणाभोवतीचा वाद अद्याप कायम आहे. हा अपघात की घातपात, यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरूच असून तपास CID कडे आहे. या प्रकरणात आमदार रोहित पवार यांनी हा घातपात असल्याचा दावा केला आहे. तर आता जय पवार यांनीही मोठी मागणी करत व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांचा मुलगा रोहित सिंग याला तात्काळ अटक करावी, असं म्हटलं आहे. बारामती पोटनिवडणुकीदरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी पुढील दोन ते तीन आठवड्यांत तपासातील महत्त्वाची माहिती समोर येईल, असे संकेत दिले.
दरम्यान, या प्रकरणात व्ही. के. सिंग आणि रोहित सिंग यांची यापूर्वी पुण्यात सुमारे नऊ तास चौकशी करण्यात आली होती. मात्र या चौकशीत त्यांना व्हीआयपी वागणूक दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही अपघाताबाबत शंका व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर लक्ष असल्याचं स्पष्ट केलं आहे, असं वक्तव्य जय पवार यांनी केलं आहे.

 

 

Published on: Apr 23, 2026 10:37 AM
Follow Us