Ajit Pawar : मुंबईतील लोकल दुर्घटनेची जबाबदारी रेल्वेचीच अन्… अजित पवार स्पष्टच म्हणाले…
मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास लोकलमधून आठ ते नऊ प्रवासी खाली पडले आणि त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेवर अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
मुंब्रा लोकल दुर्घटनेची जबाबदारी रेल्वेची असल्याचे म्हणत अजित पवार यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं. तर घडलेल्या घटनेची चौकशी केल्यानंतर काय ते सत्य समोर येईल. चौकशीअंती जे समोर येईल, त्यानंतर तशा पद्धतीने खबरदारी घेई, असंही अजित पवार म्हणाले. तर घडलेल्या रेल्वे अपघाताच्या घटनेनंतर रेल्वे बोर्डाकडून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले ज्यात आयसीएफद्वारे आताच्या लोकल गाड्यांना रेट्रो फिटमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याची सिस्टिम लावण्याचा प्रयत्न असणार आहे. या निर्णयावर बोलताना अजित पवार म्हणाले, ‘लोकलला दरवाजे केले तर कितीपत मान्य होईल यात शंका आहे. कारण लोकल स्टेशनला येण्यापूर्वीच लोकं खाली उतरतात आणि पूर्ण रेल्वे थांबण्याआधीच लोकं चढतात.’, असं अजित पवार म्हणाले.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?

