Ajit Pawar : सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण कसं असावं हे.., मिटकरी-हाकेंच्या वादावर दादांची प्रतिक्रिया
आमदार अमोल मिटकरी आणि ओबीसी नेता लक्ष्मण हाके यांच्यातल्या वादावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण कसं असलं पाहिजे, सुसंस्कृतपणा कसा असला पाहिजे, प्रत्येकाने काय वाक्य बोललं पाहिजे याचं तारतम्य प्रत्येकाला असायला हवं, अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हाके यांच्यात झालेलं संभाषण मला मुळीच आवडलेलं नाही, अशी थेट प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटलं आहे. अजित पवार यांच्या गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि ओबीसी नेता लक्ष्मण हाके यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक युद्ध सुरू आहे. लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टिकेनंतर या दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर पातळी सोडून टीका करण्यास सुरुवात केल्याने याबद्दल सर्व स्तरांतून टीका होत आहे. याच सर्व प्रकरणावर आज खुद्द अजित पवार यांनी भाष्य करत अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हाके यांच्यात झालेलं संभाषण मला मुळीच आवडलेलं नसल्याचं म्हंटलं आहे. तसंच काही विकृती असते त्याला फार महत्व देण्याचं काम नाही, असंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत

