Ajit Pawar : माझ्या बहिणीवर पुन्हा उपोषणाची वेळ येणार नाही; अजितदादा – सुप्रियाताईंचं शाब्दिक युद्ध
Ajit Pawar - Supritya Sule : श्रीक्षेत्र बनेश्वर येथील रस्त्याच्या मुद्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यात जुंपलेली आहे. एकमेकांवर दोघेही शाब्दिक हल्ला करत असल्याचं दिसत आहे.
भोर तालुक्यातील श्रीक्षेत्र बनेश्वर येथील रस्त्याच्या मुद्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यात जुंपलेली असल्याचं गेल्या 2 दिवसांपासून बघायला मिळत आहे. आज पुन्हा एकदा अजित पवार यांनी बनेश्वरच्या रस्त्याच्या मुद्यावरून सुप्रिया सुळे यांना टोमणे दिले आहेत.
पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी बनेश्वरच्या रस्त्याचे काम करण्यात यावे या मागणीसाठी भर उन्हात ठिय्या आंदोलन आणि उपोषण केले होते. भोर तालुक्यातील बनेश्वर देवस्थानच्या रस्त्याची दुरवस्था झालेली असल्याने याठिकाणी येणाऱ्या भाविकांचे हाल होतात, असा मुद्दा सुप्रिया सुळे यांनी मांडला होता. त्यानंतर काल अजित पवार यांनी खासदार आमदारांना देखील निधी मिळतो असं म्हणत सुप्रिया सुळे यांना डिवचलं होतं. त्यावर 5 कोटींच्या निधीत किती कामं होतात? असा पलटवार सुप्रिया सुळे यांनी केल्यानंतर आज पुनः अजित पवार यांनी एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना बनेश्वरच्या 600 मीटरच्या रस्त्याचं काम तातडीने सुरू होईल, तशा सूचना दिलेल्या आहे. आता परत कोणालाही उपोषण करण्याची वेळ येऊ नये, माझ्या बहिणीलापण उपोषण करायला लगायला नको, लवकरात लवकर या रस्त्याचं काम कर, अशा सूचना दिल्या असल्याचं अजित पवार यांनी यावेळी बोलताना म्हंटलं आहे.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला

