Shirur NCP Reunion : ठरलं, आगामी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींचं मनोमिलन? आता इतिहास घडणार?
शिरूर लोकसभा मतदारसंघात आगामी निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अतुल बेणके, दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते पाटील आणि माऊली कटके हे अमोल कोल्हे यांचा प्रस्ताव स्वीकारणार का, याबाबत आज संध्याकाळी बैठक होणार आहे.
पुणे जिल्ह्यात शिरूर लोकसभा मतदारसंघात आगामी निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांमधून मागणी होत असल्याने एकत्रित निवडणुका लढवण्यासाठी अमोल कोल्हे यांनी देखील तयारी दर्शविली असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे. अतुल बेणके, दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते पाटील आणि माऊली कटके हे अमोल कोल्हे यांचा प्रस्ताव स्वीकारणार का? असा सवाल असून याबाबत आज संध्याकाळी बैठक होणार आहे, अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे.
तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांनी आगामी नगरपालिका निवडणुकांबाबत भाजपला जास्तीत जास्त ताकद मिळेल असे निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे. दिवाळीपूर्वीच नगरपालिकेच्या इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण झाल्या असून, त्या प्रत्येक कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत. धारूर, गेवराई आणि माजलगाव नगरपालिकांवर त्यांचा विश्वास असून, उर्वरित ठिकाणी काय करायचे हे येत्या दोन दिवसांत ठरवले जाईल असे त्यांनी सांगितले.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?

