Subway नाही, खळखळ वाहती नदीच! अंधेरी सबवे’तील धक्कादायक दृश्य, पहा व्हिडीओ

| Updated on: Jul 04, 2026 | 3:28 PM

मुंबईत पुन्हा एकदा मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः अंधेरी, मालाड आणि दहिसर परिसरात परिस्थिती गंभीर बनली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे अंधेरी सबवे आणि मालाड सबवेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने दोन्ही सबवे वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सबवे सबवे वाटत नसून खळखळ वाहणारी नदीच वाटत आहे.

दहिसर सबवेमध्येही पाणी साचल्याने वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वाहनांची वाहतूक मंदावली असून काही ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. अंधेरीतील वीरा देसाई रोड परिसरात तसेच आझाद नगर मेट्रो स्टेशनजवळही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

महापालिका आणि आपत्कालीन यंत्रणा सतर्क झाल्या असून पाणी उपसण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर पडू नये तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Published on: Jul 04, 2026 3:28 PM
Follow Us