‘धनंजय मुंडेंना मी त्यांची जागा दाखवली, ‘बदनामिया’ नाहीतर त्यांनी माझा उल्लेख….’, अंजली दमानियांनी अख्खी कुंडलीच काढली

‘धनंजय मुंडेंना मी त्यांची जागा दाखवली, ‘बदनामिया’ नाहीतर त्यांनी माझा उल्लेख….’, अंजली दमानियांनी अख्खी कुंडलीच काढली

Harshada Shinkar | Updated on: Feb 04, 2025 | 5:54 PM

अंजली दमानिया यांच्याकडून सातत्यानं सुरू असलेल्या आरोपांनंतर आज धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दमानिया यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी दमानिया यांचा उल्लेख ‘बदनामिया’ असा केला. त्यानंतर पुन्हा दमानिया यांच्याकडून पलटवार करण्यात आला.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपांनंतर आज धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दमानिया यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांनी अंजली दमानिया यांचा उल्लेख ‘बदनामिया’ असा केला, त्यानंतर आता दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मुंडेंनी पीसी घेतली. मला वाटेल ती नावे ठेवली. दमानिया नाही तर बदनामीया नावं ठेवलं. पुराविया ठेवलं असतं तर चाललं असतं. बदनाम लोकांचे मी पुरावे देते, त्यामुळे माझं कोणतंही नाव ठेवलं तरी मला चालेल. मी एक-एक पुरावे काढून तुमची जागा दाखवणार आहे. तुम्ही जेवढा वेळ कराड सोबत होता, त्यापेक्षा एक क्षण तुम्ही मंत्री म्हणून बसला असता तर तुमच्यावर पीसी घ्यायची वेळ आली नसती’, असं अंजली दमानिया म्हणाल्या. पुढे त्या असेही म्हणाल्या, ‘मला अधिकार होता असं मुंडे म्हणतात. १२ एप्रिल २०१८ चा जीआर आहे. नवीन वस्तूंचा समावेश करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. वस्तू वगळण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना दिलेला नाही. धनंजय मुंडे यांनी डोळे उघडून बघितलं पाहिजे. डीबीटीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करण्यासाठी छाननी समिती स्थापन करण्यात आली होती. म्हणजे ही समिती जोपर्यंत मान्य करत नाही तोपर्यंत कोणतीही वस्तू डीबीटीच्या बाहेर वगळण्याचा कुणालाही अधिकार नाही. कृषी मंत्र्यांना सुद्धा नाही, मुख्यमंत्र्यांना नाही. अजितदादांनाही नाही. मुख्य सचिवांच्या नेतृत्वात ही समिती होती’, असं अंजली दमानिया म्हणाल्या, बघा पूर्ण व्हिडीओ…

Published on: Feb 04, 2025 05:54 PM
Follow Us