अजित पवारांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण, अंजली दमानिया म्हणाल्या, यांना कोर्टातूनच…
आरोप सिद्ध होईपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावर कोणतीही कारवाई करायची नाही, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. त्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या लोकांना कोर्टातूनच तडाखा दिला पाहिजे, असं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.
जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करायची नाही, असा पवित्रा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. अजितदादांच्या या भूमिकेवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे. अजितदादा थोडे बदलले असतील असं मला वाटलं होतं. सिंचन घोटाळा झाला. आता परत एकदा उपमुख्यमंत्री झाले. तरीही ते बदलले असं दिसत नाही. आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत कारवाई करणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. आता आरोप कसे सिद्ध होणार? सिंचन घोटाळा सिद्ध झाला नाही. तो बंद करण्यात आला. प्रफुल्ल पटेल यांचा घोटाळाही बंद करण्यात आला. जोपर्यंत आपण भाजपसोबत आहोत, तो पर्यंत सर्व यंत्रणा आपल्यासाठी आहेत. कितीही स्ट्राँग पुरावे असले तरी काही सिद्ध होणार नाही. हे त्यांना माहीत आहे. म्हणून यांना कोर्टातूनच तडाखा दिला पाहिजे, असं अंजली दमानिया म्हणाल्या.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

