पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा थेट व्हाईट हाऊसमध्ये पण अमेरिकेनं बोलणं टाळलं
पाकिस्तानच्या किरणा हिल्सवर झालेल्या हल्ल्यामुळे रेडिएशनची भीती निर्माण झाली आहे. यावर अमेरिकेने पाकिस्तानातील रेडिएशनच्या चर्चांवर बोलणं टाळलं आहे. पाकिस्तानाच्या किरणा हिल्सवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
पाकच्या किरणा हिल्सवर हल्ल्यामुळे रेडिएशनच्या भीतीचा प्रश्न अमेरिकेत पोहोचला आहे. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेत अमेरिकेचे विमान रेडिएशनच्या भीतीमुळे पाकिस्तानमध्ये गेले का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर माझ्याकडे सांगण्यासाठी काही नाही असं अमेरिकन प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. आमच्याकडे अंदाज लावण्यासारखं देखील काही नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालयाचे उपप्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी हे उत्तर दिलंय. प्रश्नाचं उत्तर देण्याचं अमेरिकन प्रवक्त्यांनी थेट टाळल्याचं दिसून आलं. प्रश्न सरळ होता की अमेरिकेने पाकिस्तान मध्ये रेडिएशन लीकसाठी टीम पाठवली आहे का? मात्र यावर अमेरिका उत्तर टाळत असल्याचं स्पष्ट दिसून आलं आहे.
पाकिस्तानच्या किरणा हिल्सवर भारताने हल्ला केल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. या हल्ल्यामुळे किरणा हिल्स जवळची गाव खाली केली जात असल्याच्या बातम्या देखील व्हायरल होत आहेत. पाकिस्तानच्या किरणा हिल्सवर भारताने हल्ला केल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल आहेत. भारताचा हा हल्ला एवढा अचूक होता की तिथले एअर डिफेन्स सिस्टीमला कळालाही नाही असं म्हटलं जातंय. तर किरणा हिल्सवर भारताने अटॅक केला आहे का असा पत्रकाराचा प्रश्न होता. किरणा हिल्सवर न्यूक्लियर कमांड सेंटर असल्याचं पत्रकाराने म्हटलं. पत्रकाराने विचारलेला प्रश्न आणि त्यावर एअर मार्शल एके भारतीनी दिलेलं उत्तर आपण पाहूयात.
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...

